Maharashtra Assembly Election, Shiv Sena vs Shiv Sena: विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील ४९ मतदारसंघांत शिवसेना (एकनाथ शिंदे) विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे), असा थेट सामना होणार आहे. त्यापैकी पूर्वीच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशात १९ जागांवर आणि एकट्या मुंबईत १२ ठिकाणी थेट सामना होणार आहे. मराठवाडा आणि कोकणात आठ, विदर्भात सहा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी चार जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल. मतदारांच्या नजरेतील बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? याचा निकाल या माध्यमातून लागणार आहे.

दी इंडियन एक्स्प्रेसने शिवसेना वि. शिवसेना लढतीचा आढावा घेणारा एक लेख प्रकाशित केला आहे. त्यातील माहितीनुसार, ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटासाठी लिटमस टेस्टसारखी आहे. आपल्या वडिलांचा खरा वारसदार कोण आहे? हे सिद्ध करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली आहे. तसेच अधिकच्या जागा मिळवून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा दावा आणखी बळकट करण्यासाठीही ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जाते.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
maharashtra vidhan sabha election 2024 bjp candidate sumit wankhede contest polls from arvi assembly constituency
Bjp Candidate In Arvi Assembly Constituency : भाजपचा राज्यातील सर्वात ‘लाडका’ उमेदवार, त्याच्यासाठी वाट्टेल ते
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरही शिवसेना पक्षाचे आमदार निवडून आणण्याचे आव्हान आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात ते हे काम करीत आहेत. महायुतीचे सरकार परत आणणे आणि त्यात शिवसेनेच्या अधिकाधिक जागा असणे, हे सर्वांत मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे ४० आमदारांसह बाहेर पडले होते. त्यामुळे किमान तेवढे तरी आमदार परत निवडून आणण्याचे दुसरे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. जर ४० आमदार निवडून आणले, तर शिंदे यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कायम राहील, असे आश्वासन भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले असल्याचे बोलले जाते.

हे वाचा >> Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?

लोकसभेला काय झाले होते?

ही सर्व पार्श्वभूमी पाहता, शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांचा १३ लोकसभा मतदारसंघांत एकमेकांशी सामना झाला. त्यापैकी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने सात आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने सहा जागा जिंकल्या.

मुंबई महानगर प्रदेशात काय परिस्थिती?

मुंबई महानगर क्षेत्रातील कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचा सामना आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी होणार आहे. तर, मुंबईतील वरळी येथे उद्धव ठाकरेंचा सामना शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे नेते व माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याशी होईल. तसेच वरळीतच मनसेकडून संदीप देशपांडेही रिंगणात उतरले आहेत. वरळीच्या बाजूलाच असलेल्या माहीम विधानसभेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याविरोधात, तसेच शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुंबईतील तीनपैकी केवळ एका मतदारसंघात विजय मिळविता आला होता. तर, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईत विजय मिळविला. तसेच उत्तर पूर्व मुंबई लोकसभेत शिंदे गटाने केवळ ४८ मतांनी विजय मिळविला होता. मुंबईमध्ये स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाला अजूनही आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा >> Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

कोकणातही अटीतटीची लढाई

शिवसेनेसाठी मुंबई महानगरनंतर कोकण विभाग सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. कोकण प्रदेशातील लोकसभेच्या सर्व म्हणजे पाच जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गमवाव्या लागल्या होत्या. कोकणात यावेळी कुडाळमधील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे शिंदे गटाकडून निवडणुकीला उभे आहेत. तर, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत हे रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघातून अनुक्रमे बाळ माने आणि राजन साळवी यांच्याविरोधात निवडणुकीला उतरले आहेत. तर, सावंतवाडीमध्ये राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन तेली निवडणूक लढविणार आहेत.

मराठवाडा

मराठवाड्यातही शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, तानाजी सावंत व संतोष बांगर यांच्याविरोधात या ठिकाणी उबाठा गटाचे उमेदवार उभे आहेत. तसेच विदर्भात मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गटाचे पवन जैस्वाल मैदानात उतरतील.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात पाचोरा विधानसभा मतदारसंघातही अटीतटीची लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी लढत आहेत. मालेगाव येथे मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात अद्वैय हिरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Story img Loader