अविनाश कवठेकर

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेबाबतची नाराजी आणि माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पक्षाविरोधात  भूमिका घेतल्याने पुण्यातही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Vikas Mahant came in costume of Narendra Modi in meeting of Thane Lok Sabha Constituency
ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच…
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

पुणे शहरातील एका गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असून या गटाला थोपविण्याचे प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाकडून सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून भावनिक आवाहन केले जात आहे. मात्र आगामी महापालिका निवडणूक आणि राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावरच असल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुरुवातीला पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील या बंडाला थंड प्रतिसाद मिळाला. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक पुणे, पिंपरी व जिल्ह्यात नाहीत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाला राज्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसू लागल्यानंतर शहर शिवसेनेच्या पातळीवरही उलाथापालथ सुरू झाली.
महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक आहेत. शहर आणि जिल्ह्यात शिवसेना कमकुवत आहे. त्यामुळे या बंडामुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाही, अशी शक्यता होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ काही नगरसेवकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मात्र हा प्रकारही केवळ दिखाऊ ठरला. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्यानंतर त्याचे पडसाद शहरातही दिसून येण्यास सुरुवात झाली.

शिंदे- फडणवीस सरकारला घटनाबाह्य ठरविण्यासाठी शिवसेनेकडून अरूणाचल प्रकरणाचा दाखला 

महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २२ रोजी संपुष्टात आली. महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांच्या हाती आला. नगरसेवकांचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर प्रभागातील कामांना निधी मिळत नव्हता. हीच बाब शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हेरली आणि थेट एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब पत्राद्वारे आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने आयुक्तांशी संपर्क साधत निधी देण्याचे आदेश दिले आणि शहरातील प्रभागांसाठी १६२ कोटींचा निधी देण्याचा निर्णय, आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी तातडीने वित्तीय समितीच्या बैठकीत घेतला आणि एकनाथ शिंदे समर्थकांना बळ मिळाले. त्याचे पडसाद शहर शिवसेनेतही दिसून आले. त्यामुळे आता शिवसेनाही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

आगामी महापालिका निवडणूक आणि सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटालावर शिवसेनेला टोकदार सामना करावा लागणाऱ आहे. जिल्हा संपर्क प्रमुख आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी शिवसेना फुटणार नाही, असे सांगत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची ही शिवसेना आहे, असे भावनिक आवाहन करत आहेत. बंडखोरांना चुचकारण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत. सध्या एका नगरसेवकाने बंडखोरी केली असली तरी बंडखोरीचे लोण पक्षात खालपर्यंत पोहोचले आहे, हे वास्तव आहे. अनेक आजी-माजी नगरसेवकांनी बंडाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बंडखोरांना रोखण्यासाठी शहर शिवसेना सरसावली असली तरी बंडखोरांकडून त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी करण्याची तयारीही नगरसवेकांकडून सुरू झाली आहे. अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधत असल्याची कबुलीही शहर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून खासगीत दिली जात आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर शिवसेनेला पुनर्बांधणीची आवश्यकता नाही. शहर शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार आहे, असा दावा जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी केला. मात्र शहरापेक्षा जिल्ह्यातील बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसेल, असे त्यांनी सांगितले. शहर शिवसेनेत बंडखोरी होणार नाही. काही जणांनी तयारी केली आहे. मात्र त्यांना थोपवले जाईल. मुळातच ते मूळचे शिवसैनिक नाहीत. तरीही शिवसेनाला शहरात काही फरक पडणार नाही, असा दावा शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी केला. मात्र शिवसैनिकांधील अस्वस्थता आणि बदललेली राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.