संजीव कुळकर्णी

नांदेड : कर्नाटकच्या भूमीतील ज्येष्ठ नेते खा.मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झालेला असतानाच, दिवाळी संपल्यानंतर पक्षाचे युवानेते खासदार राहुल गांधी यांची मोठ्या पल्ल्याची ‘भारत जोडो यात्रा’ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होत असून या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार असल्यामुळे ऐन दिवाळीत काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यात्रेचे स्वागत आणि इतर व्यवस्थांसाठी लगबग सुरू आहे.

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

हेही वाचा… बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाण्यास इच्छुक पण…

राहुल गांधी यांची ही यात्रा सुरू होऊन सुमारे दीड महिना झाला आहे. केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये तिला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सध्याच्या आंध्र प्रदेशातील टप्प्यात हा प्रतिसाद थोडा कमी असला, तरी ही यात्रा नांदेड जिल्ह्यात ७ नोव्हेंबरला दाखल झाल्यानंतर पुढील चार-पाच दिवस संपूर्ण माहोल ‘यात्रामय’ करण्याचे नियोजन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आतापर्यंतच्या पूर्वतयारीत यात्रेकरूंच्या मुक्कामाची स्थळे, तेथे आवश्यक असलेल्या सुविधा, भोजन व्यवस्था आणि इतर बाबी निश्चित झाल्या आहेत.

हेही वाचा… “सिंगूरमधून टाटांना बाहेरचा रस्ता मी नाही…”; ‘नॅनो’ प्रकल्पावरुन ममता बॅनर्जींचा विरोधकांवर आरोप

या यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार असल्याचे पक्षाकडून कळविण्यात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसतर्फे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेडला पहिली भेट दिली. तेव्हापासून यात्रेच्या स्वागताची सुरू झालेली तयारी आता गतिमान झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा देगलूर-नायगाव-नांदेड ते अर्धापूर असा सुमारे सव्वाशे किलोमीटरचा प्रवास होणार असून यात्रेच्या मार्गालगतच्या प्रत्येक गावांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते भेटी देत असून या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा… शिवसेनेतील भाऊबंदकीचा नंदुरबारमध्ये भाजपला लाभ; नंदुरबार जिल्हा परिषदेत विजयकुमार गावित यांची सत्ता

राहुल गांधी व त्यांच्या समवेतच्या भारत यात्रींच्या एकंदर व्यवस्थेचे नियोजन कशाप्रकारे करावे लागते, हे जाणून घेण्यासाठी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गेल्या महिन्यात केरळला गेले होते. या पथकाने तेथून सर्व तपशील जमा केला. त्यानंतर अ.भा. काँग्रेसचा एक चमूही नांदेडला पाहणी करून गेला. त्यांच्या सूचनांनुसार संपूर्ण नियोजन होत असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे यांनी दिली. काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे खा.राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांच्या सतत संपर्कात असून यात्रेदरम्यानच्या व्यवस्थांतील बारीक-बारीक तपशील मिळवून त्यानुसार तयारी होत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा… Maharashtra News Live : पक्षविस्ताराच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा ; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा… विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

भारत यात्रींची दिनचर्या

सकाळी ५ पर्यंत तयार होणे, ५ ते ६ चहा, नाश्ता, ६ वाजता ध्वजवंदन, ६.३० प्रत्यक्ष पदयात्रेला सुरूवात, ११ वाजेपर्यंत पदयात्रेत सहभाग, ११ ते दुपारी ४ भोजन, विश्रांती पण या दरम्यान विविध घटकांतील लोकांशी चर्चा, दुपारी ४ ते सायं.७ पदयात्रा व नंतर मुक्काम. या यात्रेत ६० सुसज्ज कंटेनर आहेत. देशभरातील ११८ भारत यात्रींपैकी ९ भारत यात्री महाराष्ट्रातील आहेत. कर्नाटकातील प्रवासात दररोज १५ ते २० हजार लोक राहुल यांच्या मागे १० ते १२ कि.मी. अंतर चालत होते.