संजीव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : २०१४ ते १९ दरम्यान राज्यात अस्तित्वात असलेल्या भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला.

२०१९ मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवून बहुमत मिळालेले असतानाही शिवसेनेने शेवटी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला पण भाजपासोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. आपण, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती असे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा… दसऱ्याचे राजकीय सीमोल्लंघन आणि गर्दीचा खेळ

अशा प्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असे मी या नेत्यांना सांगितले होते. परंतु ते पवार साहेबांना पुढे भेटले किंवा नाही याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी होत आहे असे कारण सांगून शिवसेनेत बंड करणारे एकनाथ शिंदे यांना युती सरकारच्या काळात भारतीय जनता पक्षासोबत फारकत घ्यायची होती ही माहिती आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर खळबळजनक आहे. अशोक चव्हाण यांच्या या खुलाशामुळे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाबाबत नेमके काय वाटते हा प्रश्न उपस्थित होणार आहे.

हेही वाचा… पंकजा मुंडे यांना मोदींबाबतचे विधान अंगलट येणार?

पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे स्वाग

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या सरकारने गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असून मी नांदेड जिल्ह्यात त्यांचे स्वागत करतो. नांदेडच्या विकासाचे प्रश्न नव्या पालकमंत्र्यांनी मार्गी लावावेेत, अशी माझी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In fadnavis government period eknath shinde approached congress and ncp to form new government ashok chavan claimed print politics news asj
First published on: 28-09-2022 at 17:57 IST