Premium

“जे पेराल, तेच उगवेल”, अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांची प्रयागराजमध्ये पहिलीच सभा

राज्यातील २५ कोटी जनता प्रयागराजमधील अलाहाबाद उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी येते. पण प्रयागराजमधील लोकच अन्याय आणि अत्याचाराने पीडित होते.

yogi adityanath
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगार-राजकीय पुढारी अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रयागराजमध्ये पाऊल ठेवले. या वेळी एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, काही लोकांनी आपल्या पापी वृत्तीने प्रयागराजच्या भूमीला जेरीस आणले होते. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी ‘रामचरितमानस’चा दाखला दिला. ते म्हणाले, हे जग कर्माच्या नियमावर चालते. जो जसा वागतो, तशीच क्रिया त्याच्यासोबत होते. उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लुकेरगंज येथील प्रेस ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करीत असताना अतिक अहमदच्या हत्येवर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे जग कर्माच्या नियमावर चालते. जे पेराल, तेच उगवेल”, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी आपला मुद्दा मांडला. मध्ययुगीन काळात तुलसीदास यांनी ‘रामचरितमानस’मधून हा विचार मांडला होता, जो आजही तंतोतंत लागू पडतो, असेही ते म्हणाले. या वेळी ज्या मैदानावर सभा होत होती, त्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट योगी आदित्यनाथ असे फलक लावण्यात आले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In first visit to prayagraj after atiq killing up cm yogi adityanath quotes ramcharitmanas talks about karma kvg

First published on: 02-05-2023 at 18:47 IST
Next Story
UCC in Karnataka : उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आता कर्नाटक; समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न