scorecardresearch

हरियाणा: भाजपाने दिली दोन नेत्यांना बढती तर एक नेत्याला दिले स्पष्ट राजकीय संकेत

हरियाणामध्ये भाजपाने एक मोठा संघटनात्मक फेरबदल केला आहे., भाजपाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि माजी खासदार सुधा यादव या हरियाणातील त्यांचे दोन नेत्यांना पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समाविष्ट केले आहे.

हरियाणा: भाजपाने दिली दोन नेत्यांना बढती तर एक नेत्याला दिले स्पष्ट राजकीय संकेत


भाजपा येणाऱ्या लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मोर्चे बांधणी सुरू करत आहेत. प्रत्येक राज्यात तिथल्या गरजेनुसार राजकीय बदल केले जात आहेत. काही नेत्यांना केंद्रामध्ये काही जबादारी दिली जात आहे तर काही नेत्यांना राज्यात जबाबदारी दिली जात आहे. हरियाणामध्ये भाजपाने एक मोठा संघटनात्मक फेरबदल केला आहे., भाजपाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि माजी खासदार सुधा यादव या हरियाणातील त्यांचे दोन नेत्यांना पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समाविष्ट केले आहे. सुधा यादव यांना भाजपाच्या संसदीय मंडळातही सामील करण्यात आले आहे. ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी महत्वाची संस्था आहे.

सुधा यादव या कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नी आहेत. भाजपाच्या सुधा यादव यांनी १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण हरियाणाच्या महेंद्रगड मतदारसंघातून राव यांचा पराभव केला होता. पण राव तेव्हा काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर  त्यांनी पुनरागमन केले आणि सुधा यांचा दोनदा पराभव केला. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे महेंद्रगड आणि गुडगावमधून सुधा यादव यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राव यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात गेल्या आठ वर्षांपासून केंद्रीय राज्यमंत्री असलेले राव यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की त्यांना भाजपमध्ये कधीच अपेक्षित हक्क मिळाला नाही. पाच वेळा खासदार आणि चार वेळा आमदार राहिलेले राव गेल्या आठ वर्षांत कधीही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या जवळच्या नेत्यांचे म्हणणे आहे की राव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रेवाडीतून त्यांची मुलगी आरती राव यांना उमेदवारी न दिल्याने पक्षावर नाराज होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राव यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले होते.
दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सुधा यादव आणि भूपेंद्र यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. राव यांच्या समर्थकांना अलिकडच्या काळात अस्वस्थ वाटले होते.

भूपेंद्र यादव यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये दक्षिण हरियाणामध्ये जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व केले होते. राव यांचे जवळचे सहकारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले की “हे आमच्यासाठीबसंकेत आहे. या राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.बअहिरवाल भागातील दोन यादवांना भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सामील करण्यात आले आहे. अहिरवालमधील सुमारे १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये यादवांची लक्षणीय उपस्थिती आहे. पक्षाने बिहार किंवा यूपीमधून यादवांना सहज निवडले असते. तिथे त्यांची मोठे शक्ती आहे.  अलीकडेनराव यांनी पक्ष आणि खट्टर यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर उघडपणे टीका केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या