दीपक महाले

ईडीच्या कारवाया, महागाई, इंधन दरवाढ यासारख्या कारणांमुळे राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होत असताना जळगाव जिल्ह्यात मात्र काहीसे वेगळे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षातील नेत्यांमध्येच संघर्ष सुरू आहे. आघाडीतील बिघाडीस कारणीभूत ठरलेले भाजपचे नेते मात्र सध्या गंमत पाहण्याच्या भूमिकेत आहेत.

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Arvind Kejriwal Arrested
अरविंद केजरीवाल : भाजपाचा अचूक लक्ष्यभेद की, ‘अति’ ची माती?
pankaja munde
मोले घातले लढाया: ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यां’ची रवानगी दिल्लीत !

काय घडलं ? काय बिघडलं ?

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची छुपी युती असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे कायमच करीत असतात. खडसे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्यास परिचित आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती असतानाही पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपच्या उमेदवार व एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदार संघात पराभूत केले. खडसे यांच्या कन्येच्या पराभवामुळे खळबळ उडाली होती. पाटलांना जामनेर या गिरीश महाजनांच्या मतदारसंघातून खडसेंविरोधात कायम रसद मिळत असल्याची चर्चा होत असते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी भाजप-शिवसेना मैत्री संपुष्टात आल्याची घोषणा खडसे यांनी केली होती. तेव्हांपासून शिवसेना खडसेंविरोधात भूमिका घेत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावरही आणि सध्या राज्यात हे दोनही पक्ष सत्तेतील भागीदार असतानाही खडसे आणि शिवसेना यांच्यात अंतर मात्र कायम आहे. जिल्हा बँक निवडणुकीप्रसंगी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला असताना खडसे यांच्या भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांचे संबंध दुरावण्यात भर पडली.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी तर खडसे महाविकास आघाडीत असले तरी आपल्या भूमिकेत फरक पडणार नसल्याचे कधीच जाहीर केले आहे. गिरीश महाजन यांचा चंद्रकांत पाटील यांनी सत्कार केल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला. विकास कामांना स्थगिती देण्याचा आरोप खडसेंनी केल्यावर चंद्रकांत पाटील यांनी त्याचा इन्कार केला. खडसे आता राष्ट्रवादीत असल्याने गिरीश महाजनही त्यांच्याविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. महाजनांनी टीका केल्यावर खडसेंकडूनही तितक्याच जोरकसपणे उत्तर दिले जात आहे. महाविकास आघाडीतील घटक असूनही शिवसेनेकडून महाजनांविरोधात मवाळ भूमिका घेतली जात असल्याने खडसे अधिक बैचेन आहेत. त्यामुळेच महाजन हे शिवसेनेला उंदीर म्हणून हिणवत असतानाही शिवसेनेचे नेते गप्प का, असा प्रश्न ते जाहीरपणे विचारतात. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रश्नाला शिवसेनेकडूनही उत्तर देताना चलाखी करण्यात येत आहे.

संभाव्य राजकीय परिणाम

सध्या जिल्ह्यात विकास कामांपेक्षा गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्याविरुध्द एकनाथ खडसे अशी लढत पाहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीसाठी पुढील राजकारणात ही लढत अडथळा ठरण्याची शक्यता अधिक आहे. आघाडीतील या साठमारीचा भाजप निश्चितच फायदा उठवू शकतो.