जालना : जालन्यात कैलास गोरट्यांल आणि अर्जुन खोतकर या आजी-माजी आमदारांमध्ये नेहमीच कुरघोडीचे राजकारण सुरू असते. परस्परांना शह देण्याची एकही संधी उभयता सोडत नाहीत. आता आभासी गुंतवणुकीतील गैरप्रकारातून हे दोघे समोरासमोर आले आहेत.

आभासी चलनातील गुंतवणुकीतीस नुकसानीस जबाबदार धरून शस्त्राच्या धाकाने किरण खरात यांचे अपहरण करून जालना पुणे येथील घरात जबरदस्तीने प्रवेश करून शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे जालना येथे राहते घर व पाच भूखंडांचे जबरदस्तीने खरेदी खते केल्याच्या आरोपावरून घनसावंगी पोलिसांनी क्रिकेटपटू विजय झोल याच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हे प्रकरण राजकीय वळणावरही गेले आहे.

Loksabha Election 2024 Bihar JDU RJD Purnia Pappu Yadav
पाचवेळा खासदार तरीही नाकारलं तिकीट; अपक्ष आमदाराने दिले JDU-RJDला आव्हान!
Maratha reservation protest Manoj Jarange Patil Antarwali Sarathi politics
मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ऐन निवडणुकीत शुकशुकाट; मनोज जरांगे दौऱ्यावर
arun govil bj merrut
निवडणूक रणसंग्रामात ‘राम नाम’ नाही, तर ‘या’ नावांची घोषणा; छोट्या पडद्यावरील रामाचा विजय होणार का?
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात

हेही वाचा… पदवीधर मतदारसंघात पदवीधरांचे प्रश्न बेदखल

किरण खरात यांनी आभासी चलनाच्या संदर्भात आरोप केलेले विजय झोल हे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई आहेत. त्यातून मग जालना येथील काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांनी याप्रकरणी खोतकर यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणात खोतकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. तर या अनुषंगाने खोतकर म्हणाले की, गोरंट्याल यांना आपल्या नावाची कावीळ झाली असून त्यांनी आपला धसका घेतला आहे. गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल गोरंट्याल यांच्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी खोतकर यांनी केली.

हेही वाचा… तांबे यांना ‘सत्तेच्या पाण्याची तहान’

किरण खरात हे माजी आमदार विलासराव खरात यांचे पुतणे आहेत. आर्थिक गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याचा व्यवसाय असलेले किरण खरात यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे की, जीडीसीसी या क्रिप्टो करन्सी कंपनीत २०१७ पासून आपण प्रमोटर म्हणून कामकाज पाहतो. या कंपनीतील गुंतवणुकीमुळे आपणास १९१९-१९२० दरम्यान बीएमडब्ल्यू मोटारगाडी भेटस्वरुपात मिळाली होती. त्यामुळे अनेकांनी चौकशी केल्यावर त्यांना आपण गुंतवणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. याच माध्यमातून विजय झोल आणि विक्रम झोल यांची २०२० मध्ये आपली ओळख झाली. त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना आर्थिक लाभही झालेला आहे. सध्या जागतिक मंदीमुळे कंपन्यांचे बाजारमूल्य खाली आल्याने झोल यांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्यही खाली आलेले आहे. त्यांच्याकडे असलेल्या ‘क्रिप्टो करन्सी’ची सध्याच्या बाजारभावाने विक्री केली तरी त्यांना फायदेशीर रक्कम मिळेल याची कल्पना झोल यांना दिलेली आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द, परळी कोर्टाचा निर्णय

असे असतानाही ४ जानेवारी रोजी आपल्या पुणे येथील घरी येऊन विजय झोल यांनी शस्त्राचा धाक दाखवून पैशांची मागणी केली आणि ५ जानेवारी रोजी औरंगाबादला नेले. त्यानंतर जालना येथे नेऊन धाक दाखवून आपले राहते घर आणि चार भूखंडांचे खरेदी खत तिघांच्या नावावर दुय्यम निबंधक कार्यालयात करून घेतले. त्यानंतरही आपली शेतजमीन आणि हॉटेल नावावर करून देण्यास सांगितले. जालना शहरातील एका बँकेत नेऊन आपल्या वेगवेगळ्या खात्यांवर १ कोटी १९ लाख ८०० रुपये जमा करून ती रक्कम अन्य वेगवेगळ्या खात्यांत जबरदस्तीने वर्ग केली, असा आरोप खरात यांनी आपल्या फिर्यादित केला आहे. घनसावंगी पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून तो कदीम जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान, ऋषिकेश शेषराव काळे या गुंतवणूकदाराच्या फिर्यादीवरून किरण खरात यांच्यासह त्यांच्या पत्नी दीप्ती आणि इतर सहकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा कदीम जालना पोलिसांनी दाखल केला आहे. खरात व इतरांनी गुंतवणुकीच्या ११ टक्के रक्कम दरमहा मिळेल तसेच करन्सी लाँच झाल्यावर भारतीय रुपयाच्या तुलनेत अनेक पटींनी परतावा मिळवून देतो, असा विश्वास दिला. त्यामुळे साडेबारा लाख घेऊन आपली आर्थिक फसवणूक झाली. याबाबत विचारणा केली असता शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे काळे यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.