कर्नाटकातील भाजपाच्या एका मंत्र्याने काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  भाजापाच्या मंत्र्यानी सिध्दारय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री असण्यास आपला विरोध नाही असं जाहीर विधान केले आहे. भाजपा नेत्याने केलेल्या विधानामुळे चर्चांमध्ये नवी राजकीय समीकरणे जुळवली जाऊ लागली आहेत. 

दोन दिवसांपूर्वी ‘बल्लारी कुरुबा संघा’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना कर्नाटकचे परिवहन मंत्री बी श्रीरामुलू म्हणाले की समाजाने त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहू नये कारण त्यांना त्यांच्या समाजाचे नेते सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून परत पाहण्याची इच्छा आहे.. सिध्दरामय्या हे याच समजतील आहेत. 

मी कुरुबांना विरोध करतो असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की सिद्धरामय्या यांना माझा विरोध नाही. संधी मिळाल्यास त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे माझे मत आहे. सिद्धरामय्या यांना विचाराले तर तेही रामुलू यांनी मुख्यमंत्री व्हावे असे सांगतील असा टोला त्यांनी लगवला. त्यांनी सिद्धरामय्या यांना २०१८ मध्ये निवडणूक जिंकण्यास मदत केली होती असा दावा करताना सिद्धरामय्या यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवताना बदामीमधून श्रीरामुलू यांचा पराभव केला होता असंही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या विधानाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. काँग्रेस नेत्यांनी असा युक्तिवाद केला की “श्रीरामुलू भाजपमध्ये पुन्हा महत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिथे २०१८ च्या विधानसभा निवडणुकांपासून त्यांचा प्रभाव कमी झाला आहे; इतरांनी याकडे कर्नाटकातील भाजपच्या वाढत्या कमकुवतपणाचे लक्षण म्हणून बघावे. पक्षात एकही मजबूत नेता नाही”.  तर श्रीरामुलू यांनी स्वतः असा दावा केला होता की हे भाष्य म्हणजे सर्व मागासलेल्या समुदायांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यासाठी केलेले अप्रत्यक्ष आवाहन आहे.

भाजपाने मात्र हे विधान गांभिर्याने घेतले आहे. पक्षाने श्रीरामुलू यांना लगेचच बेंगळुरू येथील पक्षाच्या मुख्यालयात बोलावले आणि विधानाबाबात स्पष्टीकरण मागितले. भाजपाचे नेते मात्र यावर अधिकृतपणे काहीही बोलले नाहीत.