कोल्हापूर : राजकारणाच्या बरोबरीने सहकार क्षेत्रात प्रभावी ठसा असलेल्या महायुतीतील नेत्यांनी कोल्हापुरात महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची घाई चालवली आहे. गेले काही वर्ष महायुतीकडे झुकत असलेला सुरू राजकीय प्रवेशाचा लंबक आता महाविकास आघाडीच्या दिशेने झेपावू लागला आहे. समरजित घाटगे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील , राहुल देसाई , सुरेश पाटील अशांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. घाटगे यांनी सर्वात आधी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पटकावून याची सुरुवात केली आहे.

देशांमध्ये आणि पाठोपाठ राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आले. त्याच्या काही काळ आधीपासूनच तेव्हाच्या युतीमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची जणू रांगच लागली होती. हे चित्र अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम होते. तथापि लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला जबर फटका बसला तर महाविकास आघाडीची सरशी झाले. तेव्हापासून पक्ष प्रवेशाचा काटा महायुतीकडून महाविकास आघाडीकडे झुकत चालला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हे प्रकर्षाने दिसून येऊ लागले आहे.

Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
assembly elections 2024, Sharad Pawar, MLA
५० पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याची किमया शरद पवार पुन्हा साधणार ?

हेही वाचा : Haryana Election: हरियाणामध्ये २०१९ नंतर भाजपाचे विजयी मताधिक्य घटले; यंदा काँग्रेस कडवी लढत देणार?

विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवणे हे त्याचे मुख्य कारण असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कागल मध्ये उपमुख्यमंत्री शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केल्यावर महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णतः मावळल्यानंतर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काल भव्य शक्तीप्रदर्शन करीत शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी फुंकली. ते पवारांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित झाले असून त्यांना निवडून आणण्यासाठी पवारांनी ताकद पणाला लावण्याचा निर्धार केला आहे.

छत्रपती घराणे मविआकडे

घाटगे हे राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार आहेत. श्रीमंत शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवली आणि ते खासदार झाले. पाठोपाठ घाटगे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. घाटगे हे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यासह राजे बँक, दूध संघ अशा प्रमुख संस्थांच्या शाहू सहकार उद्योगाचे प्रमुख आहेत. दशकभरापूर्वी उभय काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले सहकारातील नेते भाजपाकडे जात होते. ते आता मविआकडे येऊ लागल्याचे यातून दिसू लागले आहे. पाठोपाठ राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनीही मविआ कडून अंतर्गत उमेदवारी मिळवण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

हेही वाचा : निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक

राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचे ते गेली अनेक वर्ष अध्यक्ष आहेत. त्यांचेच मेहुणे ए. वाय. पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीचा दावा घट्ट केला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे. याच मतदारसंघातील युवा नेते भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही मविआच्या दिशेने नवी राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुका खरेदी विक्री संघाचे काम चालते . ते बिद्री साखर कारखान्याचे संचालकही आहेत. त्यांचे वडील बजरंग देसाई हे काँग्रेस कडून या मतदारसंघात आमदार झाले होते. इचलकरंजी मध्ये मेट्रो हायटेक पार्क, मारुती सहकार उद्योग समूह, मराठा आरक्षण क्रांती समितीचे संस्थापक सुरेश पाटील यांनीही भाजप पासून बाजूला जाऊन तुतारीची उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सहकारातील एकेक बडे नेते महायुतीची साथ सोडून मविआमध्ये पुन्हा सक्रीय होऊ लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील मविआची राजकीय कमान उंचावत चालली आहे.