संतोष सावंत

पनवेल : गोव्याच्या सीमेपासून (सिंधुदूर्ग) थेट गुजरातच्या सीमेपर्यंत (पालघर) विस्तारलेल्या कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या शेकापसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत आठ विविध उमेदवार अंतिम लढतीत आमनेसामने असले तरी ख-या अर्थाने महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील आणि भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात दुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीतील निकालाचा सर्वाधिक परिणाम शेकापच्या भवितव्यावर होणार असून या निवडणुकीमुळे पनवेल पालिका, रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर याचे मोठे परिणाम होणार आहेत.

Congress, Vanchit, Muslims, Akola,
अकोल्यात मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेस व वंचितचा डोळा
Amravati , ok sabha election 2024, Constituency Overview, navneet rana, bacchu kadu, BJP
मतदारसंघाचा आढावा : अमरावती; जनतेच्या न्यायालयातील लढाई नवनीत राणांसाठी अग्निदिव्य ठरणार
maharashtra, Communist Party of India Marxist, lok sabha election 2024, constituency
मार्क्सवाद्यांमध्ये मतदारसंघाच्या निवडीवरून धुसफूस
मतविभागणी, सुप्त लाट यंदाही निर्णायक घटक! कोणाला ठरणार तारक, कोणाला मारक? जाणून घेऊया बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वी शेकापला मात देत कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना कारागृहात डांबण्यासाठी सरकारला भाग पाडले. आमदार ठाकूर यांनी रचलेल्या समीकरणानुसार शेकापचे बाळाराम पाटील हे या निवडणुकीत पराभूत झाल्यास पनवेल, कर्जत, उरणमधील शेकापचे अस्तित्व संपृष्टात येण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा… परभणी जिल्ह्यात अजूनही चाचपडतेय ‘बाळासाहेबांची शिवसेना’

शेकापचा रायगड जिल्ह्यातून एकही आमदार निवडून आला नव्हता. रायगड जिल्हा परिषदेतही पक्षाचे अस्तित्व कमी झाले. रायगड म्हणजे शेकाप हे एकेकाळचे समीकरण जवळपास संपुष्टात येऊ लागले. या पार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे गेले अनेक महिने कारागृहात आहेत. त्यांच्याशिवाय शेकापला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. रयत शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शेकापची पुनर्स्थापना होईल अशी अपेक्षा अनेक शेकापच्या कार्यकर्त्यांना आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची मते बाळाराम पाटील यांनाच मिळतात का यावर शेकापचे अस्तित्व ठरणार आहे.

हेही वाचा… पालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीत सुनावणी

पाटील यांचे स्पर्धक भाजप व शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही शिक्षकांना भेटून त्यांच्या समस्या वेळोवेळी सोडविल्याचा दावा केल्याने मतदानावेळी कोणाच्या पारड्यात कोणती मते पडली याची समीक्षा करता येईल. दोन्ही स्पर्धक उमेदवार सध्या गाव व शहरी शिक्षकांच्या भेटी घेत आहेत. या निवडणुकीत ३७,७३१ शिक्षक मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. . पालघर जिल्ह्यातील ६७१८, ठाणे जिल्ह्यातील १४,६९५ रायगडमधील १०,०८५, रत्नागिरी जिल्ह्यातील ४,०६९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१६४ शिक्षकांना मतदानाचा हक्क आहे.

हेही वाचा… कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा कायम राखणार का?

रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक शाळा पनवेलमध्ये असल्याने या परिसरातील शिक्षकांच्या मोठ्या वर्गासह इतर तीन जिल्ह्यांतही गेल्या पाच वर्षांत शिक्षकांसाठी केलेल्या विविध आंदोलनांमुळे बाळाराम पाटील हे शिक्षकांकडे मतांचा जोगवा मागत आहेत तर आपल्या पाठीमागे शिवसेना आणि भाजपच्या शिक्षकांची मते असल्याचा दावा ज्ञानेश्वर म्हात्रे हे करताना दिसत आहेत.

२०१७ मध्ये शेकापचा विजय

बाळाराम पाटील (शेकाप) ११,८३७ मते मिळवून विजय झाले होते. तेव्हा ज्ञानेश्वर म्हात्रे (शिवसेना) यांना ६८८७ मते मिळाली होती. रामनाथ मोते (बंडखोर शिक्षक परिषद) यांना ५९८८ तर अशोक बेलसरे (शिक्षक भारती) यांना ४५३३ मते मिळाली होती.