ठाणे : अयोध्येतील राम मंदिराचे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात उद्धाटन झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी येत्या २९ तारखेपासून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातून ‘राम यात्रे’ची तयारी सुरु केली आहे. श्री रामाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील वेगवेगळ्या भागातून विशेष रेल्वे गाडयांची यासाठी व्यवस्था करण्यात आली असून उद्धाटन सोहळा पुर्ण होताच मंगळवारपासून पक्षाने जिल्हा पातळीवरील नेते, पदाधिकाऱ्यांना या कामासाठी जुंपले आहे.

श्रीराम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमीत्ताने संघ परिवार तसेच भाजपकडून गेल्या महिनाभरापासून व्यापक असे संपर्क अभियान राबविण्यात आले होते. जिल्ह्याचा ग्रामीण आणि शहरी भागातील वस्त्यांवस्त्यांमधून अक्षता संपर्क अभियान राबविण्याचा प्रयत्न यानिमीत्ताने करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशात विशेषत: नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच पालघर जिल्ह्यातही हे अक्षत संपर्क अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. जागोजागी संघ परिवाराशी संबंधित संस्थांचे कार्यकर्ते हे अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यरत असल्याचे पहायला मिळाले. कल्याण, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरात संघाच्या या अभियानाला भाजपकडून मोठी साथ मिळाल्याचे दिसले. राम मंदिराच्या उद्घाटनानिमीत्त शनिवारपासूनच महानगर पट्टयातील शहरांमध्ये मोठया प्रमाणार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यासारख्या शहरात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत संपूर्ण शिवसेनेची फळी जागोजागी मिरवणुका, महा आरत्यांच्या आयोजनात व्यस्त दिसली. या निमीत्ताने पुरेपूर राजकीय वातावरण निर्मीती करण्यात भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते आघाडीवर दिसले.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
mahayuti searching non controversial new face for nashik lok sabha seat
महायुतीतर्फे नव्या चेहऱ्याचा शोध; नाशिकमध्ये वाद टाळण्याचा प्रयत्न; जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अस्पष्टच
congress leader nana patole ventilator marathi news
“निवडणुकीत ‘त्यांचे’ व्हेंटिलेटरही काढतील”, नाना पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य; नवा वाद पेटण्याची चिन्हे

हेही वाचा : आसाम : भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत संघर्ष, प्रदेशाध्यक्ष बोराह जखमी!

राम यात्रांचे आयोजन

राम मंदिर उद्घाटन सोहळा पुर्ण झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यासंबंधीची वातावरणनिर्मीती कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु झाल्याचे चित्र आहे. या तयारीचा भाग म्हणून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातून अयोध्यावारीसाठी विशेष रेल्वे गाडयांची व्यवस्था भाजपकडून करण्यात आली आहे. प्रदेश भाजपकडून या संपूर्ण व्यवस्थेची आखणी करण्यात आली असून येत्या २९ तारखेला या अभियानातील पहिली ट्रेन सोडली जाणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून ३१ जानेवारीस ठाणे येथून ट्रेन सोडली जाणार असून या गाडीने अयोध्येला जाण्याची इच्छा असणाऱ्यांची नावे, त्यांच्या आधार कार्डची झेराॅक्स आणि मोबाईल क्रमांकाचे संकलन करण्याची जबाबदारी विधानसभा क्षेत्रातील आमदारांवर सोपविण्यात आली आहे. एक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसघ मोडतात. साधारपणे एका विधानसभा मतदारसंघातून ३०० याप्रमाणे या यात्रेसाठी नोंदणी केली जात आहे, अशी माहिती भाजपमधील सुत्रांनी लोकसत्ताला दिली. या यात्रेकरुंची आयोध्येतील निवासाची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यासंबंधीच्या हालचालीही सुरु आहेत, असे सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा : जय महाराष्ट्र साहेब !

“भाजप प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनेप्रमाणे येत्या ३१ जानेवारी रोजी ठाणे येथून अयोध्येसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. तेथे रामललाच्या दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची माहिती आम्ही गोळा करत आहोत.” – निरंजन डावखरे, आमदार भाजप