पिंपरी : राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीमधील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मावळ लोकसभा मतदारसंघावरून ताणाताणी सुरू असल्याचे दिसते. १५ वर्षांपासून मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यावेळी मावळमध्ये कमळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. तर, शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगतानाच चिन्ह सांगणे खुबीने टाळतात. त्यामुळे बारणे हे कमळावर निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मावळ मतदारसंघातील सलग तीन निवडणुका शिवसेनेने जिंकल्या आहेत. परंतु, आता शिवसेनेचे दोन गट झाल्याने भाजपने आक्रमकपणे मावळवर दावा केला आहे. मावळमध्ये भाजपची सर्वाधिक ताकद असल्याचे सांगत हा दावा जोरकसपणे केला जात आहे. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेले पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येतात. चिंचवडच्या अश्विनी जगताप, पनवेलचे प्रशांत ठाकूर हे भाजपचे तर उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी भाजपशी संलग्न आहेत. पिंपरी-चिंचवड, पनवेल या दोन महापालिकांमध्ये भाजपची सत्ता होती. तळेगाव दाभाडे, लोणावळा यांसह चार नगरपरिषदाही भाजपकडे होत्या. शेकडो ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मावळमध्ये एकदा कमळावर निवडणूक लढविली पाहिजे.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

हेही वाचा : पंजाबमधील सुखविलास रिसॉर्टचा वाद काय? मुख्यमंत्री मान यांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजपावर काय आरोप केले?

कमळाच्या चिन्हावर मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे. १५ वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आता भाजपला मिळावा अशी मागणी वरिष्ठांकडे केली असल्याचे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांचा नामोल्लेख टाळत आमचा कोणालाही विरोध नाही. पण, कमळ चिन्ह असावे. पक्षश्रेष्ठी ज्याला उमेदवारी देतील, त्याला दोन लाख मतांच्या फरकाने निवडून आणले जाईल, असाही विश्वास व्यक्त केला. याशिवाय गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही मावळमध्ये कमळ फुलले पाहिजे असा आग्रह असल्याचे कर्जत येथील आढावा बैठकीत सांगितले.

हेही वाचा : तेव्हा कारवाईची मागणी, त्याच कृपाशंकर सिंह यांना आता भाजपची उमेदवारी! 

भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तीन वेळा निवडून आले आहेत. एकवेळा काँग्रेस आणि सलग दोनवेळा भाजपकडून आमदार आहेत. पुढील वेळी विधानसभेला निवडून आल्यास आणि महायुतीची सत्ता कायम राहिल्यास मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदारी राहील, यामुळे ते लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जाते. चिंचवडच्या अश्विनी जगताप यांना आमदार होऊन एकच वर्षे झाले. त्यामुळे त्याही लढण्याची शक्यता नाही. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे आणि पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची लोकसभा लढविण्याची तयारी दिसते. भेगडे यांचा २०१९ मध्ये विधानसभेला पराभव झाला आहे.

हेही वाचा : पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच ओडिशामध्ये राजकीय चर्चांना उधाण; बीजेडी-भाजपा पुन्हा युती होणार का?

राष्ट्रवादीचे सुनील शेळके मावळचे आमदार असल्याने विधानसभेला त्यांनाच जागा सुटेल या शक्यतेने भेगडे यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जाते. तर, जगताप हे एक वेळा नगरसेवक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघ भाजपला सुटणार की शिवसेनेकडेच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघ भाजपला सुटल्यास विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे त्यांनाही धनुष्यबाणाऐवजी कमळावर निवडणूक लढविणे सोपे राहील, असे बोलले जाते.