मुंबई : महायुती सरकारने अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ एक कोटी सात लाख महिलांना झाला असून त्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेचा फायदा गरीब बहिणींबरोबर श्रीमंत घरातील महिलांनी देखील घेतला असल्याची चर्चा रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात हा किस्सा सांगितला. हाच किस्सा त्यांनी पुण्यातील एका जाहीर सभेत सांगताना कपाळाला हात लावून घेतला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींकडून राखी बांधून घेताना या श्रीमंत बहिणींच्या श्रीमंतीचा अनुभव घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै पासून राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना लागू केली आहे. या योजनेनुसार अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये थेट बँकेत जमा करण्यात येत आहेत.
जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. एक कोटी सात लाख पात्र बहिणींच्या बँक खात्यात लाभाचे पैसे जमा झाले आहेत. यात श्रीमंत घरातील बहिणींचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. त्याचा किस्सा पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितला. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेताना काही बहिणींची त्या मंत्र्याने विचारपूस केली.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का, किती शेती आहे. कोणते पीक घेतले आहे. यावर काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैस मिळाल्याची कबुली देताना सरकारचे अभार मानले. त्याचवेळी वीस एकरवर ऊस लावल्याचे सांगितले. ५०० ते ६०० टन ऊस कारखान्यात जात असल्याचेही महिलांनी सांगितले. त्यावरून अजित पवार यांनी उत्पन्नाचा अंदाज काढला. २०-२५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या घरातील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचा किस्सा अजित पवार यांनी मंत्रिमंडळात सांगितला.