पंढरपूर : राज्यात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला आज प्रतिसाद मिळताना दिसत असला तरी अशाप्रकारे दीड हजार रुपयांमध्ये लेकी, नाती विकत घेता येत नाहीत, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे बोलताना टीका केली.
अकलूज येथे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : जागावाटपावर बोलण्याऐवजी विरोधकांवर तोफ डागा – पटोले
अजित पवार यांच्या उमेदवारीबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, की तुम्ही एक लाखाने या की कितीही मताने या, पण निवडून जाणे महत्त्वाचे आहे. नेते, ग्रामपंचायत, दूध संघ असे सगळे एका बाजूला तर दुसरीकडे मतदार आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे चिंता नाही.