परभणी : जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची चिन्हे असून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना आपापल्या मार्गातले बंडखोरांचे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे. स्वतःच्या पक्षाने उमेदवारी न दिल्याने लगोलग दुसऱ्या छावणीत दाखल होऊन उमेदवारी मिळवल्याचेही प्रकार जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघात दिसून येत आहेत. चारही मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार जाहीर झाले असले तरी अद्याप परभणी, गंगाखेड या मतदारसंघातला महायुतीचा निर्णय झाला नाही.
पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजीत पवार गटाने श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्यावतीने सईद खान तर भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे सरचिटणीस रंगनाथ सोळंके या दोघांनी शक्तिप्रदर्शनासह निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला. सईद खान व सोळंके हे दोघेही पाथरी विधानसभेच्या रिंगणात राहतील असे संकेत आहेत. महाविकास आघाडीची उमेदवारी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांना जाहीर झाली असली तरी याठिकाणाहून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाबाजानी दुर्राणी यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा – प्रताप चिखलीकरांचे पाचवे पक्षांतर !
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असण्याची शक्यता जवळपास नाही. तथापि महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विशाल कदम यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी आमदार सीताराम घनदाट हे ही राष्ट्रवादीच्यावतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक होते मात्र कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घनदाट यांनीही वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र पर्याय निवडला आहे.
हेही वाचा – भोकरममध्ये अशोक चव्हाणांच्या कन्येला तिरुपती कदमांचे आव्हान
जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने विजय भांबळे यांना उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी असलेले सुरेश नागरे या मतदारसंघातून बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने राहुल पाटील यांना अपेक्षेप्रमाणेच उमेदवारी दिली असून ते तिसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी महायुतीत भाजप लढणार की एकनाथ शिंदे यांची शिवसेना याबाबत अजूनही अनिश्चितता होती. तथापि भाजपचे आनंद भरोसे हेच शिंदे यांच्या शिवेसेनेचे अधिकृत उमेंदवार म्हणून राहुल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवतील या चर्चेने गेल्या तीन दिवसांपासून जोर धरला आहे. भरोसे यांची उमेदवारी शिंदे यांच्या शिवसेनेकडून निश्चित मानली जात आहे. भाजपचे विजय वरपुडकर यांनीही परभणी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.