एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : सोलापुरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनपेक्षितपणे वाद सुरू झाला असून, त्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता दिसून येते.

PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
Fear for BJP in North and Congress in East Nagpur Strong line-up from both candidates
रणसंग्राम लोकसभेचा : भाजपला उत्तरमध्ये, काँग्रेसला पूर्व नागपुरात भीती; दोन्ही उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी
bjp s Maharashtra in charge Dinesh Sharma Slams Congress Manifesto as Full of False Promises
‘पक्षाला ओहोटी, काँग्रेसमध्ये सोनिया व राहुल गांधीच राहणार….’
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार सोलापुरात आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आगामी सोलापूर राखीव लोकसभा निवडणूक काँग्रेस लढविणार की राष्ट्रवादी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर, याबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असे विधान आमदार पवार यांनी केले होते. झाले..एवढ्याच निमित्ताने सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपायला सुरूवात झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आमदार रोहित पवार यांचे विधान थेट अंगावर घेतले. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला पाहिजे असल्यास बारामती लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने ठेवावी, असे प्रत्युत्तरवजा विधान नरोटे यांनी केले. हे विधानामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी नरोटे यांचे विधान बेजबाबदार आणि धमकी देण्यासारखेच असल्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी जाधव यांनी केली. अशा पध्दतीने दोन्ही काँग्रेसमध्ये सोलापुरात अनपेक्षितपणे वाद उफाळून आला आहे. त्याचे वर्णन ‘ बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी ‘ या म्हणीसारखेच करावे लागेल. या वादात दोन्ही काँग्रेसचे आणखी काही पदाधिकारी एकमेकांना भिडले आहेत. यात केवळ प्रसिध्दीचा हव्यास दिसून येतो, हेच खरे.

हेही वाचा… लिंगायत मतपेढीला नव्याने झळाळी

सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ आणि २०१९ अशा सलग दोनवेळा मोदी लाटेत पराभव झाला होता. यापूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघ खुला असताना सुशीलकुमार शिंदे याच मतदारसंघातून दोनवेळा भरघोस मतांनी निवडून आले होते. नंतर २००९ साली मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनीच लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. लोकसभेत असताना त्यांनी ऊर्जा, गृह यासारख्या मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. लोकसभा पक्षनेतेपदही त्यांच्याकडे चालून आले होते. परंतु २०१४ सालच्या मोदी लाटेत इतर अनेक दिग्गज नेत्यांप्रमाणेच सुशीलकुमारांना भाजपच्या नवख्या उमेदवाराकडून पराभूत व्हावे लागले होते. नंतर मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या वाट्याला दुसऱ्यांदा पराभव आला असता शेवटी वय आणि राजकीय परिस्थिती पाहून सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणुकांपासून दूर राहण्याची भूमिका मांडायला सुरूवात केली आहे. म्हणून सोलापुरात सलग दोनवेळा सुशीलकुमारांच्या रूपाने काँग्रेसला पराभूत व्हावे लागल्यामुळे ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडावी, अशी सुप्त मागणी या पक्षाच्या स्थानिक पातळीवर होत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही तशाच आशयाचे विधान केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनीही सोलापूर लोकसभा जागेवर अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा दावा केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हेही वाचा… प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात विदर्भातील काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची उघड भूमिका

राज्यात शिक्षक व पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीला दिलासा लाभला आहे. त्याबद्दल सोलापुरात दोन्ही काँग्रेससह उध्दव ठाकरे शिवसेना पदाधिका-यांनी एकत्र येऊन जल्लोष केला होता. तिकडे नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या मुद्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद हातघाईला आला आहे. यातच काहीच दिवसापूर्वी विधान परिषदेच्या विजयाचा एकमेकांच्या हातात हात घालून जल्लोष करणारे दोन्ही काँग्रेसचे हात आता एकमेकांच्या विरोधात पुढे सरसावले आहेत. या वादात शेवटी भरभक्कम स्थितीतील भाजपचाच लाभ होणार हे सांगायला कोणाला भाकित करायचीही गरज नाही.

हेही वाचा… शिवसेनेच्या ‘ मराठी मुस्लिम ‘ ला तोंड देण्यासाठी भाजपचे व्यापारी व कष्टकरी मुस्लिम हे ‘ लक्ष्य ‘

एकेकाळी सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्यगड मानला जात होता. भाजपने १९९० साली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर शहर उत्तरची जागा जिंकला आणि १९९९ सालचा एकमेव अपवाद वगळता सातत्याने आजतागायत वर्चस्व कायम राखले आहे. यात काँग्रेसची मोठी पिछेहाट होऊन दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटप समझोत्यात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. परंतु तरीही राष्ट्रवादीची स्थिती काँग्रेसपेक्षा वाईट असल्याचे दिसून आले आहे. आजघडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर शहर उत्तरसह दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर-मंगळवेढा अशा चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर याउलट दोन्ही काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. सोलापूर महापालिका यापूर्वीच भाजपने हिसकावून घेतली आहे. त्यापासून योग्य धडा घेण्याचा दोन्ही काँग्रेसला विसर पडला आहे. शिवसेनाही फाटाफुटीनंतर विकलांग झाली आहे. आगामी महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही आठवड्यांमध्ये कोणत्याही क्षणी जाहीर होतील. त्यानंतर पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील. या सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याची किमान कुवत तरी दोन्ही काँग्रेसकडे कितपत किती आहे, याची शंका आहे. त्याची जाणीव न बाळगता सोलापूर लोकसभेची जागा कोणी लढवायची, यावरून वाद घालणे हे दोन्ही काँग्रेससाठी आत्मघात ठरणार असल्याचे बोलले जाते.