नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पसमांदा (मागासवर्गीय) मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला सर्व समाजातील वंचित आणि दलित घटकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विकासाला गती मिळू शकते अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. विशेषत: उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात भाजपाच्या विरोधात मतदान करतो. ही पक्षासाठी निश्चितच चिंतेची बाब असल्याचं मत भाजपाच्या नेत्यांनी मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश भाजपाकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षासारखा मजबूत प्रमुख विरोधी पक्ष आहे. समाजवादी पक्ष आणि इतर ओबीसी पक्षांची मजबूत युती आहे. असं असतानाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे आठ टक्के मुस्लिम मतदारांनी भाजपाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे पसमंडा मुस्लिमांचा पाठिंबा मिळण्याची पक्षाची आशा वाढली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील एका सपा उमेदवाराने पसमंडा मुस्लिमांची मते भाजपकडे वळवल्याचे सांगत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की ” ही मते भाजपाकडे जात आहेत ही चिंतेची बाब आहे. याबाबत पक्षाने मला या समाजातील लोकांशी बोलण्यास सांगितले होते. जेव्हा मी पसमंडा मुस्लिमांच्या गावात पोहोचलो तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की त्यांना घरे, मोफत रेशन, शौचालये, एलपीजी सिलिंडर, कमी किमतीच्या वैद्यकीय सुविधा या गोष्टी भाजपा सरकारच्या काळातच मिळाल्या आहेत. इतर पक्षांनी या सुविधा त्यांच्यापर्यंत कधीही पोहोचवल्या नाहीत. मी त्यांना समाजवादी पक्षाला मत देण्याची विनंती केली आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. त्या समजतील लोकं कमी शिकलेली आहेत त्यामुळे त्यांच्यावर अशा योजनांचा प्रभाव पडला जास्त पडला”. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ पुन्हा सत्तेत आल्यानंतर नवीन मंत्रिमंडळात पसमंडा मुस्लिम समाजातील असणाऱ्या दानिश आझाद अन्सारी यांचा समावेश केला. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील ते एकमेव मुस्लिम मंत्री आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In utter pradesh bjp is concentrating on pasmanda muslim community pkd
First published on: 05-07-2022 at 13:27 IST