कर्नाटकमधील जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांत युती झाली आहे. २०२४ सालची लोकसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्र लढवणार आहेत. जेडीएसने भाजपाशी हातमिळवणी केली असली तरी या पक्षातील काही नेते मात्र या युतीमुळे नाखूश आहेत. जेडीएसच्या केरळ युनिटने आम्ही भाजपाशी युती करणार नाही, असे जाहीर केले आहे; तर कर्नाटकमध्येही काही नेत्यांनी ही युती करणे अयोग्य आहे, अशी भूमिका घेतली आहे. याच भूमिकेतून कर्नाटकमधील दोन नेत्यांनी राजीनामाही दिला आहे. काही मुस्लीम नेत्यांनीदेखील भविष्यात आम्ही वेगळा विचार करू, असे म्हटले आहे.
नाराज नेत्यांची बंगळुरू येथे बैठक
जेडीएस पक्षातील अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करणाऱ्या काही नेत्यांनी भाजपाशी केलेल्या युतीवर आक्षेप घेतला आहे. रविवारी (२४ सप्टेंबर) जेडीएस पक्षातील काही नेत्यांची बंगळुरू येथे एक बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेडीएस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री एम. एन. नाबी हे होते. या बैठकीबाबत नाबी यांनी माहिती दिली. “या युतीसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केली होती. या निर्णयामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे”, असे नाबी यांनी सांगितले. लवकरच आमची आणखी एक बैठक होणार असून त्या बैठकीनंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, असेही नाबी यांनी सांगितले.
जेडीएस पक्षाचे माजी उपाध्यक्ष शफीउल्ला बेग यांचा राजीनामा
जेडीएस पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे जेडीएस पक्षाचे माजी उपाध्यक्ष शफीउल्ला बेग यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “फक्त अल्पसंख्याक समाजाचे नेतेच नव्हे, तर जे नेते धर्मनिरपेक्ष विचाधाराचे पालन करतात, असे सर्व नेते या युतीमुळे नाराज आहेत. भाजपा
भाजपातील काही नेते अस्वस्थ
सूत्रांच्या माहितीनुसार जेडीएस पक्षाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी पक्षातील नाराज नेत्यांशी संवाध सधला. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना फारसे यश आलेले नाही. या युतीमुळे भाजपातील काही नेते अस्वस्थ आहेत. तुमकूर मतदारसंघाचे खासदार जी. एस. बसवराज यांनी या युतीला विरोध केला आहे. देवेगैडा हे तुमकूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, असे म्हटले जात आहे. याच कारणामुळे बसवराज सध्या अस्वस्थ आहेत. “गेल्या लोकसभा निवडणुकीत मी देवेगौडा यांना पराभूत केलेले आहे. ते पुन्हा एकदा याच मतदारसंघातून लढत असतील तर भविष्यात काय होईल, हे सांगता येत नाही”, अशा भावना बसवराज यांनी व्यक्त केल्या. तसेच ही युती होताना आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही, आम्हाला विश्वासात घेण्यात आलेले नाही, असेही बसवराज म्हणाले.
नाराजी दूर करण्याची जबाबदारी देवेगौडा कुटुंबावर
जेडीएस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चार ते पाच जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. यात बंगळुरू ग्रामीण, कोलार, हसान आदी मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या जेडीएस पक्षाच्या नेत्यांमध्ये असलेली अशांतता मिटवण्यात देवेगौडा कुटुंबाला यश येईल, असे भाजपाला वाटत आहे.
जेडीएस पक्षाची याआधी काँग्रेसशीही युती
एच. डी. देवेगौडा आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी याआधीही भाजपाशी युती केलेली आहे. या पक्षाने २००६ साली भाजपाशी हातमिळवणी केली होती. ही युती करताना मात्र एच. डी. देवेगौडा यांची सहमती नव्हती. या पक्षाने याआधी काँग्रेस
दरम्यान, कर्नाटकमध्ये काळानुसार जेडीएस पक्षाचा जनाधार कमी-कमी होत गेलेला आहे. सध्या आर्थिक दृष्टीने एकाच वेळी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांविरोधात लढाई करणे या पक्षाला सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे भाजपाशी युती करणे हे जेडीएस पक्षासाठी कदाचित फायद्याचे ठरू शकते.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jds alliance with bjp join nda leaders upset in karnataka prd