scorecardresearch

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असणारे वेणूगोपाल यांचे सौरऊर्जा घोटाळ्यात नाव

दिवंगत अहमद पटेल यांना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील प्रत्येकाचे बारकावे माहीत होते. त्याप्रमाणेच वेणुगोपाल यांची प्रतिमा आहे.

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असणारे वेणूगोपाल यांचे सौरऊर्जा घोटाळ्यात नाव

केरळमधील सौरऊर्जा घोटाळ्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी वेणुगोपाल यांची चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेणुगोपाल यांची एका आठवड्यापूर्वी दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. दिवंगत अहमद पटेल यांना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील प्रत्येकाचे बारकावे माहीत होते. त्याप्रमाणेच वेणुगोपाल यांची प्रतिमा आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून लढण्यासाठी तयार केले होते असे त्यांचे विश्वासू सहकारी सांगतात. केरळमधील वायनाडमधून राहुल यांचा विजय आणि अमेठीमधील काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात झालेला पराभव म्हणजे वेणुगोपाल यांच्या राजकीय कुशाग्रतेचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

मुस्लीमबहुल वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांचा पराभव झाला असा आरोप वेणूगोपाल यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी त्यावेळी केला होता. एआयसीसी सरचिटणीस असणारे के.सी वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे डोळे आणि कान आहेत अशी त्यांची पक्षात प्रतिमा आहे. अहमद पटेल हे सोनिया गांधी यांच्यासाठी जी भूमिका बजावत असत तशीच भूमिका वेणूगोपाल हे राहुल गांधी यांच्यासाठी बजावतात.  पक्षातील त्यांच्या भूमिकेमुळे अनेकवेळा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यावर बरीच टीका केली जाते. पक्षीय वर्तुळात के.सी म्हणून ओळखले जाणारे वेणुगोपाल हे एकेकाळी केरळमधील काँग्रेसच्या सुधारणावादी तरुण ब्रिगेडचा एक भाग मानले जात होते.

१९९१ मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणाकरन यांनी त्यांना कासारगोडमधून लोकसभेचे तिकीट मिळवून दिले तेव्हा वेणुगोपाल पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. त्यावेळी अवघ्या २८ वर्षांचे आणि पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या वेणुगोपाल यांचा पराभव झाला होता. १९९५ पर्यंत अर्जुन सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्याच्या तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या निर्णयाविरोधात त्यांच्या गुरूच्या म्हणजेच करुणाकरन यांच्या विरोधात गेले होते. करुणाकरन हे राव यांच्याशी जुळवून घेत होते आणि त्यांना त्यांचे संरक्षणही होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.