KCR यांच्या नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा दसऱ्याच्या मुहूर्तावर? समोर आली नवी माहिती | k chandrashekar Rao to announce his national political party on 5 october | Loksatta

KCR यांच्या नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा दसऱ्याच्या मुहूर्तावर? समोर आली नवी माहिती

तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

KCR यांच्या नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा दसऱ्याच्या मुहूर्तावर? समोर आली नवी माहिती
केसीआर

तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते लवकरच एका राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार असून त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर राव दसऱ्याच्या मुहूर्तावरच म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी आपल्या पक्षाची घोषणा करू शकतात. सध्या केसीआर आपल्या पक्षातील नेते तसेच कार्यकर्त्यांशी बैठका घेत असून पक्षाचे संविधान, धेय्यधोरण यावर चर्चा केली जात आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी ते दिल्लीत जाहीर सभा घेतील, असेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>> भारतीय हद्दीतून जाणाऱ्या इराणच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; दिल्लीत उतरण्याची परवानगी मागितली पण…

तेलंगाणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते तसेच कार्यकर्ते केसीआर आपल्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना येत्या ५ ऑक्टोबर रोजी करतील असा अंदाज लावत आहेत. पक्षीय पातळीवर तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत. केसीआर या दोन दिवसांत टीआरएस पक्षातील आमदार तसेच जिल्हाप्रमुखांच्या बैठकी घेणार आहेत. हे सर्व पदाधिकारी तेलंगाणा भवन या पक्षाचे कार्यालयात येत्या ५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा जमण्याची शक्यता आहे. यावेळी केसीआर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

हेही वाचा >>> Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद

तेलंगाणा राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार पी विनोद कुमार यांनी टीआरएस पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल अधिक भाष्य केले आहे. ५ ऑक्टोबर रोजी आमच्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करण्याबाबत चर्चा झाली आहे. या तारखेला आम्ही आमच्या पक्षाचे बदलले नाव जाहीर करू. आमच्या पक्षाचे नाव तेलंगाणा राष्ट्र समितीपासून भारतीय राष्ट्र समिती असे केले जाईल. आम्ही कोणत्याही नव्या पक्षाची नोंदणी करणार नाहीत. सध्यातरी आमची हीच योजना आहे. आगामी काळात त्यामध्ये बदल होऊ शकतो. कोणताही प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षाची नोंदणी न करता देशभरात निवडणूक लढवू शकतो. मात्र त्यासाठी प्रादेशिक पक्षाला निवडणूक आयोगाला तशी माहिती द्यावी लागते, असे कुमार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>> सोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी केसीआर यांनी वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली. यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जेडीएचे नेते एचडी दैवगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, आरजेडीचे नेते तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशुकमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राज ठाकरे यांनी नागपूर कार्यकारिणी बरखास्त करून काय साध्य केले?

संबंधित बातम्या

दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ
श्रीशैल्य उटगे : ग्रामीण जनतेचा आवाज
मेट्रो ३, समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर ; भाजपाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेग घेणार
शिरूर लोकसभा क्षेत्रातील कामांच्या निमित्ताने व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवाजीराव आढळराव शिंदे गटात सक्रिय 
रुचकर पदार्थांच्या भोजन व्यवस्थेमुळे भारतयात्री तृप्त

व्हिडिओ

ताज्या बातम्या
भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कटकारस्थान; नाना पटोले यांची टीका
“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
FIFA WC 2022: दिग्गज मॅराडोनाचा मेस्सीने मोडला विक्रम! ऑस्ट्रेलियावर मात करत अर्जेंटिना पोहचली क्वार्टर फायनलमध्ये
IND vs BAN 1st ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
“मी शिवभक्त म्हणूनच सांगतोय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन