Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency: एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडीतून एकदा काँग्रेसच्या आणि दोनदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येण्याची किमया करणारे दीपक केसरकर आता विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आव्हान आहेच; पण भाजपचे माजी आमदार राजन तेली हे त्यांच्यासाठी मोठे प्रतिस्पर्धी ठरणार आहेत.

एकेकाळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवराम राजे भोसले हे चार वेळा तर प्रवीण भोसले दोन वेळा विजयी झाले होते. जनता दलाचे जयानंद मठकर एकवेळ विजयी झाले. शिवसेनेच्या तिकिटावर शिवराम दळवी यांनी दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. या दरम्यान २००९ मध्ये केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय संपादन केला. मूळ काँग्रेस विचारसरणीच्या केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करून २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवला. ते पहिल्यांदा राज्यमंत्री तर अडीच वर्षांपूर्वी कॅबिनेट मंत्री झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून केसरकर यांना संधी मिळाली.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
sangli islampur
चावडी: इस्लामपूरची ताकद कुणाच्या पाठीशी…
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Devendra Fadnavis Political Future
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय? दिल्ली की महाराष्ट्र? भाजपासमोर यक्ष प्रश्न
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

हेही वाचा : Haryana Election : हरियाणाच्या निवडणुकीत राजकीय घराण्यातील उमेदवारांची संपत्ती जाहीर; कोण आहेत सर्वात श्रीमंत दुष्यंत चौटाला?

केसरकर यांनी सलग तीन वेळा आमदार म्हणून विजयी होऊन शिवराम राजे भोसले यांच्यानंतर इतिहास घडवला. आता पुन्हा ते चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी २०१९ व २०१४ च्या निवडणुकीत राजन तेली यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा राजन तेली निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. केसरकर हे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून असतील. त्यामुळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली नेमकी भूमिका काय घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजपमध्ये राहून तेली यांनी केसरकर निष्क्रिय असल्याची तसेच त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय दिला नसल्याची टीका केली.

केसरकर व राजन तेली अनुक्रमे शिवसेना-भाजप नेते यांच्यातील कलगीतुरा रंगला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपची संघटना बांधणी हाती घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत एकमेकांतील मतभेद बाजूला ठेवून केसरकर यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आघाडी घेतली. त्यामुळे नारायण राणे व केसरकर यांचे मनोमीलन पाहायला मिळाले. परंतु, रवींद्र चव्हाण आणि केसरकर यांचे सूर जुळले नसल्याने महायुतीतील खदखद कायम आहे. भाजप नेते या मतदारसंघावर दावा करत आहेत. मात्र, केसरकर राजकीय पटलावर मुरब्बी राजकारणी ठरले आहेत. ते थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्याशी सख्य ठेवून आहेत.

हेही वाचा : Parliamentary Standing Committee : काँग्रेसला मिळाल्या संसदेच्या चार स्थायी समित्या, सत्ताधाऱ्यांबरोबरच्या वाटाघाटीत मोठं यश

केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६९ हजार ७८४ मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार राजन तेली यांनी ५६ हजार ५५६ मते घेतली. केसरकर यांना १३ हजार २२८ ची आघाडी मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना ८५ हजार ३१२ तर ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत यांना ५३ हजार ५९३ मते मिळाली. राणे यांना ३१ हजार ७१९ मताधिक्य मिळाले.