कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर येथे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. नेतेमंडळी तिकीट मिळण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी भाजपासमोर येथील सत्ता कायम राखण्याचे आव्हान असेल. त्यामुळे तिकीटवाटपादरम्यान भाजपाला सतर्कता बाळगावी लागणार आहे. दरम्यान, यावेळी भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाकडून कोणत्याही नेत्याची मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार म्हणून घोषणा केली जाणार नाही. निवडणुकीनंतर यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> वडील आणि मुलगा दोघांचीही आमदारकी गेली; आझम खान आणि अब्दुल्ला खानच्या मतदारसंघावर भाजपाचा झेंडा?

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

बसवराज बोम्मई अयशस्वी?

भाजपा येथे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. मागील काही दिवसांमध्ये बसवराज बोम्मई सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. भविष्यात लिंगायत समाजाचे नेते म्हणून नावारुपाला यावेत म्हणून बसवराज बोम्मई यांच्याकडे सत्ता सोपवण्यात आली होती. मात्र यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत, असे भाजपाचे मत आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी तसेच जातीय समीकरणं जुळून येण्यासाठी ते बसवराज बोम्मई किंवा अन्य कोणत्याही नेत्याची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्याची शक्यता नाही.

हेही वाचा >> Karnataka Assembly Election 2023 : भाजप आणि देवेगौडा परस्पर पूरक भूमिका घेणार का ?

छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागल्यास स्थिती वेगळी

भाजपा निवडणुकीअगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याऐवजी निवडणुकीनंतर यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपाने बहुमताने सत्ता राखल्यास विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद राहु शकते. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला अन्य छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागल्यास स्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे, असे मत स्थानिक भाजपा नेत्यांचे आहे.

हेही वाचा >> Karnataka: मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन योजना; कर्नाटक विधानसभेसाठी ‘आप’कडून आश्वासनांची खैरात

दरम्यान, भाजपा कर्नाटकमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कटील या चेहऱ्यांना समोर ठेवून भाजपा येथे निवडणूक लढवणार आहे.