कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच कारणामुळे भाजपासह काँग्रेसने कंबर कसली असून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, बैठकांचे आयोजन केले जात आहे. वेगवेगळ्या पक्षांतील नेतेदेखील ही निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्या सोईच्या पक्षाला जवळ करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीपूर्वी विद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेले भाजपाचे दोन महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपानंतर के कविता आक्रमक; म्हणाल्या, “घाबरणार नाही, मुख्य टार्गेट…”

Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

दोन मंत्री काँग्रेसच्या वाटेवर

विद्यमान बसवराज बोम्मई सरकारमध्ये गृहनिर्माणमंत्री असलेले व्ही सोमण्णा आणि क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री केसी नारायण गौडा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोमण्णा यांनी २००८ साली तर गौडा यांनी जेडी(एस) पक्षाला २०१९ साली सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा >>> काँग्रेस नेत्याच्या मुलाचीच राहुल गांंधींवर टीका; लंडनमधील विधानाचा उल्लेख करत म्हणाले, “ते भारतात येऊन…”

पक्षात योग्य स्थान न मिळाल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक प्रदेश भाजपा या दोन्ही नेत्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे दोन्हीही नेते निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. आगामी निवडणुकीत आपले पुत्र अरुण सोमण्णा यांना तिकीट मिळावे यासाठी व्ही सोमण्णा प्रयत्नशील आहेत. असे असताना ज्येष्ठता लक्षात घेऊन पक्षात योग्य स्थान न मिळाल्यामुळे सोमण्णा नाराज असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे नारायण गौडा हेदेखील पक्षावर नाराज आहेत. काँग्रेसने आपल्याशी संपर्क केल्याचा दावा गौडा यांनी केला आहे.

हेही वाचा >>> लाच प्रकरणी भाजपा आमदाराला जामीन मिळाल्यावर काढलेली मिरवणूक ‘लाजिरवाणी’ बाब; भाजपा मंत्र्यांची कबुली

दोन मंत्र्यांना रोखण्याचा भाजपाकडून पुरेपूर प्रयत्न

दरम्यान, या निवडणुकीआधी काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काँग्रेसकडडून बसवराज बोम्मई सरकार भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. असे असतानाच या दोन नेत्यांनी पक्षबदल केल्यास आगामी निवडणुकीत भाजपाला त्याचा आगामी बसू शकतो. याच कारणामुळे या दोन्ही नेत्यांना रोखण्यासाठी भाजपाकडू पूर्ण प्रयत्न केला जात आहे.