कर्नाटकमध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येत्या १० फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या बसवराज बोम्मई यांच्या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात बोम्मई सरकार लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र एकीकडे हे सरकार लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता असली, तरी त्यासाठी निधी उभारण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राष्ट्रवादीने सत्यजित तांबेंना खरंच मदत केली? अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण; म्हणाले “आमच्या…”

येणाऱ्या १० फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकार आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात लोकप्रिया घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोम्मई सरकार निवडणुका तोंडावर असताना कर वाढीचा निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. त्यातच केंद्र सरकारने जीसएटी नुकसानभरपाई बंद केली आहे. जीएसटी नुकसान भरपाई मिळणारे कर्नाटक सर्वात मोठे लाभार्थी राज्य होते. मात्र आता जीएसटी भरपाई थांबवल्यामुळे सरकार अर्थसंकल्पातील प्रस्तावित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उभारणी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत विचारले असता “निधीची कमतरता भासणार नाही, याची आम्ही खरबदारी घेतली आहे,” अशी प्रतिक्रिया बसवराज बोम्मई यांनी दिली.

हेही वाचा >>> ठरलं! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी कायम, शनिवारी जागावाटप जाहीर होणार

दरम्यान, बोम्मई सरकारने राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांना निधी पुरवण्यासाठी कर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील विविध योजनांसाठी केंद्राकडून दिला जाणारा निधी, तसेच जीएसटी भरपाईचा निधी राज्य सरकारला अद्याप मिळालेला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka budget 2023 on 10 february how cm basavaraj bommai will manage funds for different schemes prd
First published on: 03-02-2023 at 21:02 IST