कर्नाटकातील भाजपा सरकार सत्तेत आल्याला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटक सरकार मोठ्या प्रमाणात तिसरा वर्धापन साजरा करण्याची तयारी करत आहे. यासोबतच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यकाळाचा पहिला वर्धापन दिन २८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या नवीन योजना आखत आहे.

बोम्मई सरकारने यापूर्वी २८ जुलै रोजी दोन्ही वर्धापन दिवस एकत्र साजरा करण्यासाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता परंतु २६ जुलै रोजी राज्यातील दक्षिण कन्नड प्रदेशात भाजपचे युवा नेते प्रवीण नेत्तारू यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.  मंगळवारी रात्री मुख्यमंत्री बोम्मई यांच्या शासकीय निवासस्थानी भाजप सरकारच्या यशाचा गौरव करण्यासाठी ‘जनोत्सव’ आयोजित करण्यासाठी बैठक झाली. मात्र कर्नाटकात भाजप सरकार प्रभावीपणे काम करत नसल्याच्या भाजपचे मंत्री जे सी मधुस्वामी यांनी केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असल्याची चर्चा सुरू आहे. जे सी मधुस्वामी यांनी कार्यकर्त्याशी केलेल्या दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरून काँग्रेसने भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे.

ज्या ठिकाणी २८ जुलैचा कार्यक्रम नियोजित त्या दोड्डाबल्लापूर या ठिकाणीच जनउत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करण्याचा येणार आहे असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महसूल मंत्री आर अशोक, फलोत्पादन मंत्री एन मुनीरथना आणि सहकार मंत्री एस टी सोमशेखर यांच्यासह भाजपा सरकारमधील मंत्री जे बोम्मई यांच्या जवळचे सहकारी आहेत, त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते.

नेतारू यांच्या हत्येबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने २८ जुलै रोजी होणारा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला. या कार्यक्रमात २०२३ च्या राज्य निवडणुकीचे बिगुल वाजवण्याची अपेक्षा असलेल्या कार्यक्रमाला नड्डा मुळात उपस्थित राहणार होते. “आम्ही लोकांसाठी केलेले कार्यक्रम साजरे करायचे होते. आता मनाला शांती नाही आणि कुटुंबाच्या आणि प्रवीणच्या आईच्या भावना पाहून आम्ही कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” बोम्मई यांनी 27 जुलै रोजी सांगितले होते.