scorecardresearch

केरळ : CPI(M) जिल्हा समितीने ३५ लाख रुपये जमवून आपल्या ज्येष्ठ नेत्याला त्यांच्या पत्नीच्या जमिनीवर बांधून दिले घर

दहा वर्ष आमदार आणि पाच वर्ष मंत्री राहूनही नव्हते स्वत:चे घर

केरळ : CPI(M) जिल्हा समितीने ३५ लाख रुपये जमवून आपल्या ज्येष्ठ नेत्याला त्यांच्या पत्नीच्या जमिनीवर बांधून दिले घर

सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते पी के गुरुदासन यांची तुलना कोणत्याही राजकीय पक्षातील आजकालच्या अशा नेत्यांशी करता येणार नाही, जे लोक निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि निवडणुक जिंकल्यानंतर काही वर्षांमध्येच भरमसाट संपत्ती जमा करून करोडपती बनले आहेत.

कम्युनिस्ट नेते गुरुदासन ज्यांनी सीपीआय(एम) केंद्रीय समितीचे सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी गुरुवारी वयाच्या ८७ व्या वर्षी एक अशा घरात प्रवेश केला, जे त्यांची पत्नी सी लिली यांच्या मालकीच्या १० सेंट जागेवर पक्षाने बांधले आहे. तिरुवनंतरपुमर जिल्ह्यातील करेते येथे १७०० स्क्वेअर फूट, दोन बेडरुमचे घर सीपीआय(एम)च्या कोल्लम जिल्ह्यातील समितीद्नारे बांधले गेले होते. ज्यासाठी पक्षाने जिल्हाभरातील वरिष्ठ सदस्यांकडून ३५ लाख रुपये जमवले होते. कारण, आतापर्यंत गुरुदासन हे भाड्याच्या घरात आणि पक्षाने दिलेल्या सुविधा न घेता राहत होते.

CPI(M) ट्रेड यूनियन विंग, सीटूचे एक प्रमुख नेते असलेले गुरुदासन दहा वर्षे आमदार होते आणि २००६ ते २०११ पर्यंत वी. एस. अच्युतानंदन यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री म्हणूनही कार्यरत होते. याशिवाय पक्षाचे जिल्हा सचिव म्हणून कार्य करत असताना ते कोल्लमध्ये तब्बल २५ वर्ष पक्ष कार्यालयाजवळ एका भाड्याच्या घरात राहिले होते.

यावेळी भावना व्यक्त करताना गुरदासन म्हणाले, “हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. पक्षाचे काम हे पैसे कमावण्यासाठी नसून, राजकीय काम पुढे नेण्यासाठी असते. स्वत:च्या संपत्तीनेच घर बांधता येते. माझ्याकडे तसे पैसे नसल्याने कोल्लम जिल्हा समितीने माझ्यासाठी घऱ बांधले आहे. माझ्या मालकीचे घर असावे असे मला कधीच वाटले नाही. मी अनेक भाड्याच्या घरांमध्ये राहिलो आहे आणि मी मंत्री असताना शासकीय निवासस्थानी राहिलो.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 21:08 IST

संबंधित बातम्या