राम भाकरे

नागपूर : संघर्षशील वृत्तीचे किशोर कुमेरिया यांनी शिवसेनेत प्रवेश करून राजकीय कारकीर्द सुरू केली. शिवसेनेत अनेकदा फूट पडली पण कुमेरिया मूळ शिवसेनेसोबतच राहिले. आत्ताही ते उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत. एक लढवय्या कट्टर शिवसैनिक अशी त्यांची नागपूरच्या राजकारणात ओळख आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

हेही वाचा… गजानन मालपुरे : सर्वसामान्य कार्यकर्ता

विविध समस्यांवर प्रशासनाशी संघर्ष करण्याचा त्यांचा मूळ स्वभाव. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासूनच त्यांचा आंदोलनात सहभाग होता. रमना मारोती परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. टँकर मिळत नव्हते, या समस्येविरोधात परिसरातील युवकांना सोबत घेत झोन कार्यालयापुढे आंदोलन केले. त्यासाठी आठ दिवस तुरुंगात जावे लागले होते. त्या राजकारणात प्रवेश केल्याशिवाय समस्या सुटत नाही हे लक्षात आल्यावर कुमेरिया यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. लोकांसाठी लढणारा युवक अशी त्यांची प्रतिमा झाली. शिवसेनेत त्यांनी अनेक पदावर काम केले. १९९६ ते २००७ या काळात गट शाखा प्रमुख, शाखा प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळत पूर्व-दक्षिण नागपुरात त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला. २००२ मध्ये प्रभाग क्रमांक ६ मधून प्रथमच महापालिकेची निवडणूक लढवली व जिंकलीही. त्यानंतर सलग २००७ , २०१२ व २०१७ असे चार वेळा ते सलग या भागातून नगरसेवक म्हणून निवडून गेले. या काळात कार्यकारी महापौर, उपमहापौर, नेहरू नगर प्रभाग सभापती आणि विविध समित्यांवर राहून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००७ ते २००९ या काळात ते उपमहापौर होते.

हेही वाचा… डॉ. देवेंद्र वानखडे : लोकपाल आंदोलनातून राजकारणात

दक्षिण नागपुरातून त्यांनी शिवसेनेकडून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली व त्यांना यश आले नाही. घराण्यात राजकीय कुठलाही वारसा नाही, पण शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मदतीला धावण्याचा त्यांचा स्वभाव आहे. करोनाकाळात स्वत:च्या कार्यालयात २४ तास हजर राहून लोकांना त्यांनी मदत केली. संघर्ष केल्याशिवाय आज काहीच मिळत नाही आणि तो आजही करतो आहे, असे कुमेरिया म्हणाले.