scorecardresearch

साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राज्यातील सत्ताधारी नेत्यांत कटुता?

राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री कारखान्यावर झेंडा रोवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे.

bidri sugar factory election, kolhapur sugar factory politics in marathi, bidri sakhar karkhana politics
साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राज्यातील सत्ताधारी नेत्यांत कटुता? (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : न्यायालयीन वाद, चौकशीत अडकलेली दूधगंगा वेदगंगा (बिद्री) सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली असताना तिला महाभारताचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जवळचे नातेवाईक एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. प्रमुख पक्षांमध्ये फुट पडली आहे. राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री कारखान्यावर झेंडा रोवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे.

चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या बिद्री कारखान्यावर गेली दोन दशके राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत त्यांच्या आघाडीत कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. या आघाडीत भाजपच्या उमेदवारांना संधी दिली होती. त्यांच्या विरोधात के. पी. पाटील यांचे विधानसभेचे स्पर्धक आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार दिनकरराव जाधव होते. आरोप – प्रत्यारोपाने निवडणूक ढवळून निघाली होती. त्यामध्ये पुन्हा एकदा विजय खेचून आणत के. पी. पाटील यांनी अध्यक्षपद पटकावले होते.

beef smuggling in gondia, 2 beef smuggler arrested in gondia, salekasa area beef smuggling
साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात
eknath shinde
“नांदेड अन् घाटी रूग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती, दोषींवर…”, मुख्यमंत्र्यांचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ निर्देश
Chandrashekhar Bawankule symbolic statue burn
बुलढाणा : ढाब्याऐवजी पत्रकार उतरले रस्त्यावर! बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
BJP Kolhapur
कोल्हापूरातील भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; कार्यालयाला टाळे ठोकले

हेही वाचा : नगर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे असेही शक्तिप्रदर्शन

विरोधकांचे तगडे आव्हान

या निवडणुकीत चित्र आमूलाग्र बदलले आहे. मुळात कारखान्याची निवडणूक होऊ नये यासाठी विरोधकांनी न्यायालयात धाव घेत जंग जंग पछाडले होते. कारखान्याचे विशेष लेखापरीक्षण व्हावे यासाठीही प्रयत्न केले होते. तथापि मुश्रीफ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत गेल्याने विरोधकांच्या प्रयत्नावर पाणी फिरले. आता विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असून या खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अबिटकर, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे असे मोठे नेते आहेत. भाजप या निवडणुकीत उतरणार नाही तर ताकतीने जिंकणार आहे, असे खासदार महाडिक, समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले असल्याने सत्ताधारी आघाडी समोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

पाटीलकीचे महाभारत

मुख्य म्हणजे के. पी. पाटील यांचे मेहुणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही सत्ताधारी आघाडीला सोडचिट्ठी देत विरोधी आघाडीतून उमेदवारी दाखल केली आहे. हि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पालकमंत्री मुश्रीफ यांनी आपण, के. पी . पाटील आणि ए. वाय. पाटील हे मेहुणे- पाहुणे पाहुणे विचाराने एकत्रित गुंफले असल्याचे भावनिक विधान केले होते. त्यांनी के. पी. आणि ए. वाय. या दोन्ही पाटलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. पण ते सफल ठरले नाहीत. त्यावर, सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि पक्षीय राजकारण भिन्न असते हे वास्तव आहे. तरीही ए. वाय. पाटील यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. ते का सोडून गेले हे कळले नाही. कदाचित त्यांचे प्रेम पातळ झाले असेल, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांना द्यावी लागली आहे.

हेही वाचा : भुजबळांमागे कुणाचे ‘बळ’ ?

विधानसभा नि कारखाना

राधानगरी भुदरगड विधानसभा कार्यक्षेत्रात गेली २५ वर्षे के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील राजकारण करीत आहेत. के. पी. पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्तासूत्रे आणि विधानसभेची उमेदवारी, आमदारकी असते. यात आपल्यावर अन्याय होतो; तो आणखी किती काळ सहन करायचा, हि ए. वाय. पाटील यांची अंतरीची सल. कारखाना आणि पाठोपाठ येणारी विधानसभा निवडणुक हि सम साधत ए. वाय. यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. आपल्यावरील अन्यायाचा पाढा मुश्रीफ यांच्या समोर त्यांनी वाचून दाखवला होता. राधानगरी तालुक्यातील सहा जागा आणि कारखान्याचे अध्यक्षपद यावर तोडगा निघत नसल्याने माझे जमत नाही असा निरोप त्यांनी धाडला होता. तेव्हाच त्यांचे लक्ष कारखान्याच्या अध्यक्षपदावर असल्याचे उघड झाले. ए. वाय. पाटील यांना राधानगरी भुदरगड मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे. इकडे ही निवडणूक लढवण्याची तयारी के. पी. पाटील यांनी केली आहे. त्यामुळे याही मुद्द्यावर मेहुणे- पाहुणे यांचे जमत नसल्याने राजकीय वितुष्ट निर्माण झाले आहे.

भाजपाला धक्का

ए. वाय. पाटील यांनी लढाईच्या वेळी साथ सोडणे हा मुश्रीफ – के. पी. पाटील यांना धक्का आहे. त्यातून सावरत या दोघांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील तसेच दिनकरराव जाधव, संजय घाटगे, बजरंग देसाई या माजी आमदारांना सोबत घेत सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या आघाडीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आहेत. समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक सुनीलराज सूर्यवंशी यांनीही सत्तारूढ आघाडी कडून उमेदवारी मिळवली आहे. मुश्रीफ यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे आमदार सतेज पाटील यांच्याकडे सोपवली आहेत. बिद्रीने राज्यात सर्वाधिक दर दिला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण केले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प उत्तमपणे चालला आहे. इथेनॉल निर्मिती यावर्षी सुरू होणार आहे. या सत्तारूढ गटाच्या जमेच्या बाजू आहेत. त्यावर विरोधकांनी टीका चालवली आहे. निवडणूक काळ पुढे सरकेल तसा अंदाज बांधणे कठीण होणार असून प्रचाराचा रागरंग कसा राहतो यावर गुलाल कोणाचा हे ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur bidri sugar factory election politics between kp patil and ay patil hasan mushrif chandrakant patil print politics news css

First published on: 20-11-2023 at 12:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×