कोलकातामधील शासकीय आर. जी. कर रुग्णालयात गेल्या शुक्रवारी (९ ऑगस्ट) एका शिकाऊ महिला डॉक्टरची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशभरातच संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये या घटनेच्या विरोधात ‘रिक्लेम द नाईट’ हे आंदोलन करत बुधवारी (१४ ऑगस्ट) मध्यरात्री महिला शहरातील रस्त्यांवर उतरल्या आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणावरून आता पश्चिम बंगालमधील राजकारण प्रचंड तापले असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षामध्येही मतमतांतरे दिसून आली.

हेही वाचा : दीड कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योजना

Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan iftar party
Baba Siddiqui Murder: सामान्य कार्यकर्ता ते मंत्री, बॉलीवूडमध्येही चलती; बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास कसा होता?
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
ghulam nabi azad democratic progressive azad party
जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझादांच्या पक्षाचे राजकारण संपुष्टात? विधानसभा निवडणूक कामगिरीनंतर चर्चांना उधाण
Haryana assembly bjp victory
जाटेतर, दलित, अपक्षांची साथ; हरियाणामध्ये भाजपच्या विजयात इतर मागासवर्गीयांचा महत्त्वाचा वाटा
Sangli district, political supremacy in Sangli district,
सांगलीतील संघर्ष मुद्द्यांवरून गुद्द्यांवर !
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : काश्मीरला गरज सकारात्मक राजकारणाची
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी आपल्या समाजमाध्यमावरून या निषेध आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले, तर तृणमूल काँग्रेसच्या इतर काही नेत्यांनी हे आंदोलन म्हणजे पश्चिम बंगालला बदनाम करण्यासाठी भाजपा आणि माकपने रचलेले एक राजकीय षडयंत्र असल्याची टीका केली आहे. खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी आपण ‘रिक्लेम द नाईट’ या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा करताना आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी या आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होईन. पुढे ते म्हणाले की, “मी विशेषत: यासाठी सहभागी होईन, कारण इतर लाखो बंगाली कुटुंबांप्रमाणेच मलाही एक मुलगी आणि लहान नात आहे. महिलांविरोधातील हा क्रूरपणा आता पूरे झाला; चला सगळे मिळून याचा प्रतिकार करूयात.”

पश्चिम बंगाल राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष अनन्या चक्रवर्ती यांनीही या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आणि आपल्या समाजमाध्यमांवरून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहनही केले. त्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. “जे या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांनी आपापल्या घरी शंख फुंकून या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करावा,” असेही त्यांनी म्हटले. मात्र, तृणमूल काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी या आंदोलनाला कडाडून विरोधही केला. त्यातीलच एक प्रमुख नेते म्हणजे दिनहाटाचे उदयन गुहा होय. उदयन गुहा यांच्या वक्तव्यावर कठोर टीका करताना पश्चिम बंगाल भाजपाने समाजमाध्यमावर पोस्ट केले की, “एकीकडे पश्चिम बंगालमधील जनता आर. जी. कर बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आणि शंख फुंकण्याचे नियोजन करत आहे, तर दुसरीकडे उदयन गुहा बीभत्स विनोद करताना दिसत असून ते महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराला हसण्यावारी नेत आहेत.” तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही या आंदोलनावर टीका केली. घोष म्हणाले की, “नंदिग्राम, सिंगुर, हाथरस आणि मणिपूरसारख्या घटनांचे पाठिराखे आता रात्री जमून नौटंकी करत आहेत. पश्चिम बंगालमधील रात्रीचे वातावरण महिलांसाठी नेहमीच सुरक्षित राहिले आहे. अनेक माता-भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रात्रीही कामे करतात, हे आंदोलनकर्ते वास्तवामध्ये फक्त राजकारण करत आहेत.”

हेही वाचा : BJP : भाजपा हा ‘वृद्धांचा’ पक्ष ? विरोधक तरुण नेत्यांना संधी देत असताना पार्टीसमोरचं वयोवृद्धांचं आव्हान?

दुसऱ्या बाजूला तृणमूलचे प्रवक्ते आणि तृणमूल काँग्रेसचे आयटीप्रमुख देबांगशु भट्टाचार्य यांनी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला; मात्र सहभागींना त्यांच्यात सामील होणाऱ्यांपासून सावध राहण्यास सांगितले. “या आंदोलनासाठी सदिच्छा आहेत, महिलांच्या आंदोलनाचा विजय असो. मात्र, सावध राहा, लाल तरस (माकप) हे आंदोलन हायजॅक करण्यासाठी तयार आहेत. या आंदोलनाच्या आगीवर ते आपली पोळी भाजून घेऊ इच्छित आहेत,” असे ते म्हणाले. याआधी बुधवारी काही डाव्या संघटनांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी निषेध सभा आयोजित केली होती. या सभेला अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. भाजपाने पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये स्वतंत्रपणे निदर्शने केली आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.