राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया होत असताना लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं दिसून आलं. सोमवारी सिंगापूरमध्ये त्यांच्यावर ही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. कन्या रोहिणी आचार्य यांनी लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केली. यावेळी त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब सतत संपर्कात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७४ वर्षीय लालू प्रसाद यादव मागील काही काळापासून तीव्र मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. यावेळी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य आपल्या वडिलांना किडनी दान करण्यासाठी पुढे सरसावली. त्यांनीच कुटुंबियांना शस्त्रक्रियेसाठी सिंगापूरमध्ये येण्याचा सल्ला दिला. अभियंता राव समरेश सिंग यांच्याशी विवाह झाल्यानंतर रोहिणी आचार्य या सिंगापूरला वास्तव्याला गेल्या आहेत. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.

हेही वाचा- समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा: उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या वादानंतर झटपट नूतनीकरण

शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी रोहिणी आचार्य यांनी ट्वीट केलं की, “रॉक अँड रोलसाठी सज्ज आहे, शस्त्रक्रियेसाठी मला शुभेच्छा द्या. वडिलांच्या निरोगी आरोग्यापेक्षा आपल्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा- मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार

लालू प्रसाद यांच्यावर शस्त्रक्रिया होत असताना त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची मोठी मुलगी आणि राज्यसभा खासदार मीसा भारती आणि त्यांचा धाकटा मुलगा तेजस्वी प्रसाद यादव हे सर्वजण सिंगापूरमध्ये होते. तर लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि राज्यमंत्री तेज प्रताप यादव यांनी पाटणा येथे राहून वडिलांच्या प्रकृतीसाठी ‘महामृत्युंजय जाप’ पठणकेलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu prasad yadav kidney transplant surgery daughter donate kidney family rmm
First published on: 06-12-2022 at 19:56 IST