बिपीन देशपांडे

औरंगाबाद महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग रचनेच्या आराखड्याला अंतिम स्वरुप देण्याचे कामकाज सुरू असतानाच त्यातील गोपनीय माहिती समाजमाध्यमावरून सार्वजनिक झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. महापालिकेने ही फुटलेली माहिती अधिकृत नसल्याचे पत्रक काढून एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी यातून मनपा प्रशासनातील कामकाजावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच या प्रकारातून प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची कोंडी करण्यामागचे अदृश्य ‘बाण’ नेमके कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. शिवसेना धार्जिणे प्रशासक, असा आरोप होणाऱ्या पाण्डेय यांना अडचणीत आणले जात असल्याची शंकाही यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. 

इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

आस्तिककुमार पाण्डेय यांची कुशल प्रशासक म्हणून ओळख झालेली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास आस्तिककुमार यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळे साहजिकच प्रशासन हाताळताना घेतलेल्या कडक भूमिकेवरून पाण्डेय यांच्यावर शिवसेना धार्जिणे प्रशासक असल्याचा आराेपही अन्य पक्षातील नेत्यांकडून कायम केला गेलेला आहे. पाण्डेय यांच्या जवळपास अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेना नेत्यांकडूनही यापूर्वी कधीही प्रशासकांची काेंडी हाेणारे टीकात्मक वक्तव्य, आंदाेलन करण्यात आलेले नाही. अपवाद अलीकडचा शहराचा पाणीप्रश्न वगळता. त्यातही राज ठाकरे यांची सभा आणि देवेंद्र फडणवीस यांचे जलआक्रोश आंदोलनाच्या मधल्या काळात केवळ प्रशासकांची केवळ भेट घेऊन पाणीप्रश्न मांडण्यात आलेला होता. मात्र, दाेन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला प्रभाग रचनेचा आराखडा समाजमाध्यमावरून सार्वजनिक झाल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान प्रसारित झालेला हा आराखडा अनधिकृत असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र या मागे शिवसेना नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचाच हात असल्याची चर्चा आहे. महापालिकेत शिवसेना पदाधिकाऱ्यांचीच अधिक उठबस असल्याने त्यांच्यापैकीच काेणीतरी अधिकाऱ्याला हाताशी धरून तयार केलेला प्रभाग रचनेचा आराखडा मिळवला आणि ताे समाजमाध्यमावरून पसरवल्याची चर्चा महानगरपालिकेच्या वर्तुळात सध्या सुरू आहे. अशी हिंमत सध्या अन्य पक्षांकडे नाही, असाही एक सूर आहे. 

या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी मुंबई गाठत राज्य निवडणूक आयाेगाकडे प्रभाग रचनेचा आराखडा फुटल्याप्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. समाजमाध्यमावर आराखडा तयार करण्यापूर्वी त्याची कच्ची प्रत २३ मे राेजी सादर करण्यात आली असून त्याला अंतिम करण्याचे काम राज्य निवडणूक आयाेगाकडून सुरू असताना हा प्रकार घडल्याची तक्रार आमदार शिरसाठ यांनी केली आहे. या प्रकरणात राज्य निवडणूक आयाेगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिलेले असले तरी या सर्व घडामाेडीमागे शिवसेनेचाच ‘बाण’ असल्याची चर्चा आहे.