छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा स्तर उमेदवारांच्या जात प्रवर्गांनंतर आता तो अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत खाली घसरला आहे. सध्या समाज माध्यमावर प्रशासन तसेच निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकारी आणि त्यांची जात दर्शवणारे संदेश फिरत असून त्याची चर्चा जाहीर सभांमध्ये केली जात आहे.

बीड लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या दोघांमधील प्रचाराला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ओबीसी विरुद्ध मराठा, असा जातीय रंग देण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेतकरी-पुत्र विरुद्ध राजकन्या असली तरी ऊसतोड मजुर वर्गांमध्ये वावरणारी त्यांची लेक, असाही रंग देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतरच्या प्रचाराचा अंक हा अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत आला. एका गटाने प्रशासनातील प्रमुख अधिकारी हे वंजारी समाजाचे असल्याचे संदेश समाज माध्यमावरून पसरवण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाने मराठा समाजातील अधिकाऱ्यांची थेट जंत्रीच सादर केली. अधिकारी व त्यांच्या नावासमोर त्यांची मराठा जात, याची माहिती संदेशांमधून लिहून ते प्रसृत करण्याचा धडाका लावला. याशिवाय लोकप्रतिनिधी किती मराठा समाजातील आहेत, याचीही याच संदेशात माहिती ठळक नोंदीत केलेली दिसते आहे. अधिकाऱ्यांच्या जातींवरील संदेश पसरवण्यास वेग आल्यानंतर तोच मुद्दा अखेर प्रचारसभांमध्ये केंद्रस्थानी आला.

beed lok sabha latest marathi news, beed lok sabha election 2024
मतदारसंघाचा आढावा : बीड; जातीय ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला ?
Parbhani Lok Sabha, Mahadev Jankar,
मतदारसंघ आढावा : परभणी… जातीय समीकरणांची आकडेमोड आणि फेरमांडणी
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
sangli lok sabha marathi news, bjp sanjaykaka patil sangli marathi news, vishal patil sangli marathi news
सांगलीतील चित्र बदलले, भाजप – अपक्षात चुरस
parbhani lok sabha marathi news, caste polarization parbhani lok sabha marathi news
परभणीच्या प्रचारात जातीय ध्रुवीकरणाचा धुराळा
The candidature of Bajrang Sonwane from the NCP Sharad Pawar group has been announced in Beed Lok Sabha constituency
बीडचा तिढा सुटला, बजरंग सोनवणे यांना उमेदवारी; मराठा ध्रुवीकरणाच्या परिघात नवी लढत
Pankaja Munde
बीड लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठे आव्हान कोणते? पंकजा मुंडे म्हणाल्या…

आणखी वाचा-“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पाटोदा-शिरूर-आष्टी तालुक्यांच्या सीमाभागातील गावांमध्ये केलेल्या प्रचारादरम्यान, अधिकाऱ्यांच्या जातीवरून प्रसृत होणाऱ्या संदेशावरून चांगलाच समाचार घेतला. आपण पालकमंत्री असतानाची जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सकांपासून इतरही अधिकारी कोण होते, त्यांची जात कोणती होती याची यादी तपासून पाहा, त्यांची नावे आत्ता इथे सांगते आणि ते माझ्या जातीचे आहेत का, हेही पडताळा, असे थेट सुनावले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेल्यांची जात काढणे यासारखे दुसरे दुर्दैवं नाही, असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा-ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित

आत्ताच्या काळात काही विशिष्ट अधिकारी एका समुदायाच्या जातीतील असतील तर त्याचा जिल्ह्याच्या प्रमुख कारभाऱ्यांनी विचार करायला हवा, असेही पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे सूचितच केले आहे. आरक्षणाच्या मागणीवरूनही पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. कितीही उपोषणे, भाषणे केली तरी अशा पद्धतीने आरक्षण मिळत नसते, त्यासाठी विशिष्ट पद्धत असून सामाजिक मागासलेपण सिद्ध झाले तरच आरक्षण मिळू शकेल, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ज्या पाटोदा तालुक्याच्या परिसरात आरक्षण, जात या मुद्यावरून भाषणे केली त्याच परिसरात दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचाही दौरा झालेला होता. एकूणच बीडमधील प्रचाराला कायमच जातीचा रंग दिला जात असला तरी यावेळी त्याचा स्तर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत येऊन घसरला आहे.