क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस सावित्रीबाई फुले यांचेच कार्य पुढे नेत आहेत. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी आल्यापासून परत जाईपर्यंत भुजबळ मुख्यमंत्र्यांबरोबर होते. भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत एकूण पन्नास मिनिटे एकाच गाडीतून प्रवास केला. याबाबत मुख्यमंत्री रवाना झाल्यानंतर छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार कार्यक्रमाला का आले नाहीत. भुजबळ म्हणाले ते कुठे आहेत हे मलाच माहीत नाही. मग मुख्यमंत्र्यांबरोबर एवढा वेळ होतात तेव्हा काय चर्चा झाली. भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमासाठी आलेले होते. गाडीमध्ये कार्यक्रमाच्या व स्मारकाच्या अनुषंगाने विषय झाला. इतर कोणताही राजकीय विषय झाला नाही. अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय विषय कसे करू शकतो, असा उलटा प्रश्न केला. फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि भुजबळांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट लागले. ईडीच्या कारवाईत दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. तेव्हा फडणवीसांच्या नावे ठणाठणा करणारे भुजबळ आता मात्र फडणवीसांचे तोंडभरून कौतुक करीत आहेत. शेवटी काळाचा माहिमा महत्त्वाचा असतो.

हेही वाचा >>>Delhi Assembly Election 2025 : Delhi Assembly तिकीट वाटप ते प्रचार, दिल्ली विधानसभेसाठी मायावतींच्या पक्षाने आखली मोठी रणनीति

Delhi Election Result 2025
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’च्या नेत्यानेच केजरीवालांना दिला सल्ला; म्हणाले, “काँग्रेसबरोबर…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Loksatta Varshavedh special issue issue released by chief minister devendra fadnavis
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला रंगत; ‘लोकसत्ता वर्षवेध’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
PM Modi Addresses Public Rally At RK Puram In Delhi
दिल्ली प्रचाराची आज सांगता!पंतप्रधानांकडून अर्थसंकल्पाची प्रशंसा; विरोधकांवर टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन

माझे दुकान स्वतंत्र !

विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल राम शिंदे यांचा अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र सत्कार समारंभाकडे भाजपसह महायुतीच्या सर्वच खासदार, आमदारांनी पाठ फिरवली. स्वत:ला अपक्ष म्हणून घेणारे सत्यजित तांबे व काँग्रेसचे हेमंत उगले असे दोनच आमदार उपस्थित होते. या समारंभावेळीच शिर्डीमधील भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांनी बैठक आयोजित केली होती. भाजपचे आमदार, पदाधिकारी या बैठकीला मात्र उपस्थित होते. या विरोधाभासी घटनांकडे राधाकृष्ण विखे व राम शिंदे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. मात्र हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा विखे यांनी केला आहे. शिर्डीतील बैठक पूर्वनियोजित होती असेही त्यांनी सांगितले. सत्कार समारंभाला उपस्थित असलेले सत्यजित तांबे हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांनी आपल्याला सभापतींबरोबरचे संबंध जपण्यासाठी उपस्थित राहणे भागच आहे. त्यांनी मला सभागृहात बोलू दिले नाही तर माझे काहीच चालणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी केली. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या समारंभाला उपस्थित राहिले. त्याकडे आमदार ओगले यांनी दोनदा लक्ष वेधत आमदार तांबेही आमचेच आहेत असा दावा केला. मात्र सत्यजित तांबे यांनी हा दावा लगेच फेटाळत ‘माझे दुकान स्वतंत्र आहे’ अशी भूमिका मांडली.

सदस्य नोंदणी अशीही …

सध्या भाजपचे सदस्य नोंदणी अभियान मोठ्या जोमात सुरू आहे. केंद्रात, राज्यात पक्ष सत्तेवर असल्याने अभियानास गर्दीही दिसत आहे. रविवारी असेच एकेठिकाणी माजी नगरसेवकांने अभियान मोठ्या दिमाखात सुरू केले. जास्तीत जास्त सदस्य आपलेच व्हावेत यासाठी दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रयत्नशील तर आहेतच, पण महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल का याची शाश्वती सध्या तरी मिळत नाही. आता ताकाला जाऊन मोगा कशाला लपवायचा असा साधा विचार त्यांने बूथवर मांडला तर त्याला आक्षेप घेणारे उभे राहिलेच, पक्षासाठी भाऊंनी त्याग केला, तुलाही त्यागाची सवय पाहिजेच. नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी वाट्टेल ते करायच्या तयारीत असलेल्या इच्छुकांने मग काढता पाय कधी घेतला आणि दुसऱ्या दुकानाचा शोध कधी सुरू केला हे नेत्यालाच नव्हे तर बूथवरच्यांनाही कळलं नाही. बिच्चारे नोंदणीसाठी हजेरीवर आलेल्यांनी आता त्याचा शोध सुरू केला आहे.

(संकलन : मोहनीराज लहाडे, विश्वास पवार, दिगंबर शिंदे)

Story img Loader