विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल या धसक्याने पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण गेल्या आठवड्यात घाईघाईने उरकण्यात आले. जोगेश्वरीच्या पालिकेच्या विभाग कार्यालयाचे असेच घाईघाईत उद्घाटन करण्याचा कार्यक्रम निश्चित झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम असल्याने पालिका आयुक्तांपासून सारे झाडून अधिकारी उपस्थित होते. सायंकाळचा कार्यक्रम पण रात्रीचे आठ वाजले तरी मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे मुंबई आणि ठाण्यात भरपूर कार्यक्रम. मुख्यमंत्री नियोजितस्थळी पोहचले पण तेव्हा वाजले होते मध्यरात्रीचे २ ! मुख्यमंत्री येणार म्हणून अधिकाऱ्यांना थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण स्थानिक नागरिक उशीर झाल्याने एव्हाना घरी परतले होते. अशा पद्धतीने पालिकेच्या विभाग कार्यालयाचे अखेर मध्यरात्री उद्घाटन झाले.
चावडी: उद्घाटन मध्यरात्री २ वाजता!
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल या धसक्याने पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण गेल्या आठवड्यात घाईघाईने उरकण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-10-2024 at 05:32 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chavdi bhoomipujan and dedication of various development works of the municipality amy