जरांगे पाटील रात्रभर मराठा, मुस्लीम आणि दलित मतांच्या बेरजा- वजाबाक्या ऐकत होते. फोन यायचा ते आतमध्ये जायचे. मग पुन्हा बाहेर यायचे. दोन दिवसांपासून उमेदवार उभे करणार म्हणून उमेदवारी न मिळणारे सारे जण आंतरवलीमध्ये मुक्कामी. कोणी गाडीत डुलकी मारली तर कोणी ऐकत बसले सारी चर्चा. सोमवारी सकाळी उमेदवार जाहीर करायचे नाहीत असे ठरले तेव्हा बंडखोर आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक म्हणाले… नुसतंच जागरण झालं हो. आता पाटील, पाटील अशा घोषणा देऊ आणि ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देऊ!

गाजराची पुंगी वाजवायची की खायची?

मिरज शहर चाळीस वर्षांपूर्वी टांग्यासाठी प्रसिद्ध होते. वॉन्लेस हॉस्पिटल, दत्त मैदान, किसान चौक आणि रेल्वे स्टेशन या ठिकाणी टांगा थांबे होते. रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना टांग्यातून प्रवास करावा लागत होता. प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा आल्यानंतर टांगा रस्त्यावरून गायबच झाला आहे. तरीही त्यावेळी टांगामालक घोड्यापुढे गवताची पेंढी बांधून टांगा पळवत होते. घोडा मात्र गवताच्या आशेने धावत असायचा. तशीच अवस्था निवडणुकीत इच्छुकांची झाली आहे. लोकसभेवेळी उमेदवारीच्या आशेने इच्छुक पळपळ पळाले. आता मात्र लक्षात आले आहे की, ते उमेदवारीचे गाजर होते. आता गाजराची पुंगी वाजवायची की खायची याचा विचार करून डोके खाजवयाची वेळ आली आहे.

Manoj Jarange influence is likely to benefit the state including Marathwada
माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
Raj Thackeray on Code of Conduct
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…

हेही वाचा >>>Akola West constituency : विदर्भात वंचितची नामुष्की! मध्य नागपूरनंतर आता अकोला पश्चिममध्ये उमेदवारी माघार

शरद पवारांच्या सभेशिवाय पाऊस थांबणार नाही !

साताऱ्यातील अनेक तालुक्यांत ऐन दिवाळीत पाऊस झाला. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यावेळी कायम दुष्काळी असणाऱ्या माण खटाव आणि फलटण तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वैतागला असून पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे. एका शेतकऱ्याने दुसऱ्याला विचारले की पाऊस थांबणार कधी. सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. गेल्या निवडणुकीत साताऱ्यात शरद पवार पावसात भिजत घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. आता परत त्यांची सभा होत नाही तोपर्यंत पाऊस काही थांबणार नाही. त्याला मिळालेल्या उत्तराने तोही चक्रवाला आहे. असे उत्तर त्याला मिळाल्याने आता पाऊस थांबण्यासाठी शरद पवारांच्या सभेची वाट पाहावी लागणार आहे.

(संकलन : सुहास सरदेशमुख, विश्वास पवार, दिगंबर शिंदे)

Story img Loader