Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore : मागील तीन निवडणुकीत आपला प्रभाव कायम ठेवत आमदारकी टिकविणारे माण खटाव या दुष्काळी मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यावेळी मात्र विरोधकांकडून होणाऱ्या टोकाच्या आरोपांमुळे, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे, त्यांच्या विश्वासार्हतेला आणि जनाधाराला तडा गेल्याने प्रथमच अडचणीत आले आहेत.

२००९ च्या निवडणुकीत व २०१४ मध्ये काँग्रेस आणि २०१९ मध्ये भाजपाकडून निवडणूक लढवताना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात फक्त २९५५ मतांची आघाडी मिळवत पराभवाची नामुष्की त्यांनी टाळली होती. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी मतदार संघातून नाईक निंबाळकर यांना २३ हजार ३६५ मतांची आघाडी मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी जयकुमार गोरे तसे निश्चिंत असल्याचे ते सांगत आहेत.

samarjeetsinh ghatge bjp ncp marathi news
कोल्हापूरच्या ‘समरा’त पवारांची ‘जीत’, घाटगेंच्या प्रवेशामुळे मुश्रीफांसमोर आव्हान
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
assembly elections 2024, Sharad Pawar, MLA
५० पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याची किमया शरद पवार पुन्हा साधणार ?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
kolhapur mahayuti marathi news
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत
BJP rashtriya seva Sangh Co ordinator Constituency Upcoming Assembly Election
निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर

हेही वाचा >>>Haryana Election: हरियाणामध्ये २०१९ नंतर भाजपाचे विजयी मताधिक्य घटले; यंदा काँग्रेस कडवी लढत देणार?

आक्रमकपणे आपली ताकद वाढवत नेल्याने त्यांना बस्तान बसविणे शक्य झाले. भाजपच्या राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी जवळकीचा त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणासाठी, मतदासंघांसाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. विरोधक आपल्याविरोधात एकत्र येणारच नाहीत याची काळजी त्यांनी घेतली. आतापर्यंतच्या निवडणुकात गोरेंचा स्वत:चा जनाधार, त्याला भाजपाची मिळालेली ताकद या बाबी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्या आहेत. पुणे बंगळूरु या नव्या कॉरिडॉरमुळे माण खटावमध्ये होणारे मोठे औद्याोगीकरण, दुष्काळग्रस्त मतदारसंघांच्या पाणी प्रश्नासाठी केलेले प्रयत्न, सध्या कटापूर व अन्य उपसा सिंचन योजनेतून मतदारसंघातील दुष्काळी शिवारात खळखळणारे पाणी हा मुद्दा त्यांच्यासाठी पाणीदार ठरू शकतो. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांची झालेली ‘जलनायक’ अशी छबी (इमेज)चा त्यांना फायदाही होईल.

प्रभाकर देशमुख सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. शरद पवार यांनीही त्यांना मोठी ताकद दिली आहे. सर्व विरोधक एकत्र येऊन यावेळी निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीत त्यांना बळ मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर होणाऱ्या आरोपामुळे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचाही त्यांना सामना करावा लागू शकतो. दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा मुख्यआरोप त्यांच्यावर झाला आहे. याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणावरून विधिमंडळाच्या अधिवेशनातही जयंत पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात खडाजंगी झाली होती. नुकताच त्यांच्या ताफ्यातील एका ठेकेदाराच्या भरधाव गाडीने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यांचा झालेला जागीच मृत्यू.

हेही वाचा >>>कोकणात उदय सामंत, राजन साळवी यांच्यातील वाद विकोपाला

मतदारसंघात गोरे विरुद्ध देशमुख यांच्यात थेट लढत होणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीमधील इच्छुकांच्या ऐक्यावर प्रभाकर देशमुख यांचे भवितव्य अवलंबून असेल. दर वेळी होणारी मत विभागणी, टाळल्यास त्याचा फायदा देशमुख यांना होऊ शकतो. मात्र विभागणी झाल्यास त्याचा फायदा गोरेंना होणार हे निश्चित. मात्र मागील वर्षा दीडवर्षांमध्ये मतदार संघात झालेल्या अनेक घडामोडीमुळे जयकुमार गोरे यांच्या विश्वासार्हतेचे झालेले मोठे नुकसान आणि मागील काही महिन्यात दुरावलेला जनाधार यावर ते कसा मार्ग काढतात यावर त्यांच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून आहे.

ठोकशाही राजकारणाचा परिणाम

मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्ते आणि ठेकेदारांकडून होणारे दबावाचे आणि ठोकशाहीचे राजकारण असे अनेक मुद्दे त्यांच्या निवडणुकीवर परिणाम करतील असे आहेत. हेच मुद्दे घेऊन विरोधक एकत्र येत त्यांच्यावर सध्या जोरदार टीका करत आहेत. हे मुद्दे आगामी विधानसभा निवडणुकीत पेटल्यास जयकुमार गोरेंना निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे जयकुमार गोरे यांना विजयी चौकार ठोकायचा असल्यास दुसरीकडे गटातटाच राजकारण आणि पक्षांतर्गत कुरुबुरी यावर तोडगा काढावा लागेल.