Vasmat Assembly Constituency in Vidhan Sabha Election 2024 : वसमत मतदारसंघात राजू नवघरेंना निवडून आणण्यासाठी जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि राजू नवघरे अजित पवार गटात राहिले. पण नवघरे दांडेगावकरांना राजकीय गुरू मानतात. त्यामुळे आता मतदारसंघात गुरू- शिष्याचा सामना होईल असे मानले जात आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल असे चित्र दिसून येत आहे.

दांडेगावकर यांना लोकसभा निवडणुकीत उतरायचे होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना मिळाली. तेथून नागेश पाटील आष्टीकर निवडून आले. त्यामुळे दांडेगावकर यांनी आता वसमत मतदारसंघ बांधणीस सुरुवात केली आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकीय संपर्क ठेवणारे दांडेगावकर यांची ओळख शरद पवार यांचे जवळचे सहकारी अशी आहे.

bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Loksatta karan rajkaran double challenge Anil Deshmukh Karad Dakshin Constituency Assembly Election 2024 in Satara District print politics news
कारण राजकारण: पृथ्वीराज चव्हाण यांना यंदा पुन्हा दुहेरी आव्हान?
Ajit pawar on Assembly Election 2024
Ajit Pawar: ‘महायुतीत असलो तरी…’, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका
kolhapur mahayuti marathi news
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत
Kalidas Kolambkar in Wadala Assembly Election 2024 Marathi News
कारण राजकारण: कालिदास कोळंबकर यांना यंदाची निवडणूक कठीण?
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
samarjeetsinh ghatge bjp ncp marathi news
कोल्हापूरच्या ‘समरा’त पवारांची ‘जीत’, घाटगेंच्या प्रवेशामुळे मुश्रीफांसमोर आव्हान

हेही वाचा >>>सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे(शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शिवस्वराज्य यात्रेनिमित्त दौरा झाला. त्या वेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा, असे कळविले होते. मतदारसंघातील विकास कामासाठी निधी मिळावा म्हणून आमदार राजू नवघरे यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक साधली होती. आता हे आमदार आपल्याच बरोबर रहावेत यासाठी अजित पवार यांनीही अलिकडेच दौरा केला. या दौऱ्यात मराठा आंदोलकांनी मात्र बराच गोंधळ घातला. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पुन्हा एकदा ‘मराठा आरक्षण’ केंद्रीत मतदान होण्याची शक्यता वर्तविली जाते.

हेही वाचा >>>Ajit Pawar: ‘महायुतीत असलो तरी…’, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत दांडेगावकर गटाला सत्ता मिळाली होती. निवडून आलेल्या बहुसंख्य संचालकांचा राजू नवघरे यांना सभापती करण्याला विरोध असताना दांडेगावकर यांनी राजू नवघरे यांना सभापती केले. परिणामी दांडेगावकर यांचे कट्टर समर्थक कुरुंदा येथील वसमत बाजार समितीचे माजी सभापती राजेश पाटील इंगोले, व इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग केला. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. राजू नवघरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. त्याला अप्रत्यक्ष दांडेगावकर यांनीही मूक संमती दिली. अशाही परिस्थितीत दांडेगावकर यांनी राजू नवघरे यांना विधानसभेच्या निवडणुकीत पुढे करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आता तेच नवघरे दांडेगावकर यांच्यासमोर निवडणुकीत उतरतील का, असा प्रश्न होता. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दांडेगावकर यांनीही जाहीर केले.