कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे वारे तापले टाकले असताना एकेक कार्यकर्ता जवळ करून प्रचाराला गती देण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात बरेच प्रमुख पदाधिकारी, दुसऱ्या फळीतील प्रमुख कार्यकर्ते हे उघडपणे विरोधी गटाला साथ देऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेल्या उमेदवारावर कारवाईचा बडगा उगारण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतल्याचे दिसत असताना विरोधकांना उघडपणे मदत करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांसोबत कारवाई ऐवजी सबुरीची भूमिका सर्वपक्षांनी घेतल्याने त्याची चर्चा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत होत आहे ती कागलमध्ये. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजितसिंह घाटगे यांच्यात निकराची लढत होत आहे. या मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये तिरंगी लढत झाली आहे. येथे पाच वेळा आमदार झालेले मुश्रीफ यांना शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे हे त्यांचे महाविद्यालयीन मित्र आव्हान देत आले आहेत. या दोघांची लढत नुरा कुस्ती म्हणून पाहिली जात असे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आणखी वाचा-सांगलीत दादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

या वेळेला घाटगे यांनी त्यांचा कारखाना उभारण्यास मदत केल्याची परतफेड म्हणून आपली ताकद मुश्रीफ यांच्या पाठीशी उभी केल्याने त्यांचे बळ वाढले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार असल्याने घाटगे हे आघाडीधर्माचे पालन करीत महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारात दिसायला हवेत. पण ते सध्या मैत्रीधर्म निभावत मुश्रीफ यांच्या प्रचारात धडाडीने उतरले आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्यांनी आघाडी धर्माचे पालन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. पण आपलेच काही पदाधिकारी विरोधकांना मदत करत असताना यावर त्यांनी मौन पाळले.

आणखी वाचा-रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील लढत लक्षणीय

पन्हाळा मतदारसंघांमध्ये जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्याशी उद्धव ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर हा पारंपारिक सामना होत आहे. येथे काँग्रेसशी संबंधित करण गायकवाड, अमर पाटील हे प्रमुख युवा नेते उघडपणे महायुतीच्या प्रचारात उतरले आहेत. इचलकरंजी मतदारसंघात भाजपचे राहुल आवाडे व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्या लढत होत आहे. भाजपचे माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव, माजी नगरसेवक प्रमोद पाटील हे तुतारीच्या प्रचारात उतरले आहेत. शिरोळ मध्ये आमदार राजेंद्र पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात रंगतदार सामना होत आहे. येथे भाजपशी सबंधित यादव काका पुतणे कॉंग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांना साथ देत आहेत. अन्य मतदारसंघांमध्येही काही कार्यकर्ते असेच विरोधी गटाची तळी उचलताना दिसत असले तरी याबाबत सध्या तरी कारवाई ऐवजी सारे आलबेल दिसत असल्याने राजकारणातील निष्ठेची चर्चा होत आहे.

Story img Loader