सोलापूर : प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने मोहिते-पाटील कुटुंबीयांचा कडवा विरोध डावलून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ‘तुतारी’ हाती घेऊन मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. या घडामोडींमध्ये ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे कोठेही दिसत नाहीत. ते स्वतःला अजूनही भाजपमध्येच असल्याचा दावा करीत आहेत. मात्र भाजपने त्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूरच ठेवले आहे. किंबहुना ते पक्षात अघोषित बहिष्कृत मानले जात आहेत.

सध्या मोहिते-पाटील कुटुंबीय एकीकडे तर रणजितसिंह मोहिते-पाटील हे एकीकडे असे चित्र कायम दिसून येते. भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतच विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुनःश्च संधी मिळाल्यामुळे अवमानित झालेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गावभेटीच्या नावाखाली संपूर्ण मतदारसंघात जनसंवाद वाढविला. यातून भाजपच्या विरोधात मोहिते-पाटील कुटुंबीयांचे बंडखोरीचे वारे वाहात असताना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे एकटेच भाजपच्या बाजूने उभे राहिले. कुटुंबीयांची नाराजी मिटण्याबाबत ते आशावाद बाळगून होते. पक्षाने दिलेली आमदारकी आणि शंकर सहकारी साखर कारखान्याला दिलेले आर्थिक साह्य तसेच भविष्यातील संभाव्य अडचणींचा विचार करता रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मानसिकता भाजपच्या बाजूने होती आणि आजही दिसून येते.

uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
Devendra Fadnavis
‘भाजपासाठी महाराष्ट्र अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आव्हान आहेच…”
Praful Patel on Uddhav Thackeray
प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर…”

हेही वाचा – गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?

तथापि, दुसरीकडे राजकीयदृष्ट्या मोहिते-पाटील कुटुंबीयांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा होता. त्याचाच विचार करून मोहिते-पाटील कुटुंबीयांनी आमदार रणजितसिंह यांना बाजूला ठेवून भाजपच्या विरोधात विजयाची गणिते जुळविण्याच्या अनुषंगाने शरद पवार, रामराजे निंबाळकर, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील (अलिबाग), सांगोल्यातील शेकापचे नेते डॉ. अनिकेत व डॉ. बाबासाहेब देशमुख बंधुंबरोबर खलबते सुरू केली. तेव्हा दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नित्य संपर्कात होते. फडणवीस हेसुद्धा भाजपच्या उमेदवारीबद्दल ताठर राहिले असताना इकडे अकलूजमध्ये शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील या तिघा जुन्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन रणनीती आखली. त्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आणि त्यांची उमेदवारीही आली. या साऱ्या घडामोडींपासून दूर राहिलेले आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे दुसरीकडे भाजपमध्येही ‘नकोसे ‘ मानले जाऊ लागले.

हेही वाचा – “मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल

भाजपसह महायुतीच्या स्थानिक गाठीभेटी आणि बैठकांपासून प्रचार सभा, मेळाव्यांमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा कोठेही सहभाग दिसत नाही. महायुतीच्या व्यासपीठावर त्यांचे नाव आणि छबीही दिसत नाही. गेल्या १६ एप्रिल रोजी माढ्यातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यावेळीही रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुपस्थिती होती. अर्थात प्रचार कार्यासाठी पक्षाकडून बोलावणेच आले नसेल तर रणजितसिंह येणार कसे ! सध्या ते महायुतीमध्ये नाहीत आणि भाजपमध्येही अघोषित बहिष्कृत ठरल्याचे मानले जातात. यासंदर्भात ते स्वतः कोणतेही भाष्य करीत नाहीत.