मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस तसेच भाजपाने कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षाने तर आतापासून या निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून येथे १५ जूनपासून ‘कमलनाथ संदेश यात्रे’चे आयोजन केले जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून मागास प्रवर्गातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच या यात्रेमध्ये भाजपा आणि शिवराजसिंह चौहाण यांच्या कारभारातील त्रुटी लोकांसमोर आणल्या जाणार आहेत.

१५ जूनपासून यात्रेला सुरुवात

या यात्रेची सुरुवात येत्या १५ जूनपासून होणार आहे. विशेष म्हणजे खुद्द कमलानाथ या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही यात्रा पहिल्या टप्प्यात बुंदेलखंड प्रदेशातील एकूण १० जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे. एकूण २३ लाख लोकांशी या यात्रेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या यात्रेबाबत मध्य प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच मध्य प्रदेश काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे कार्याध्यक्ष दामोदरसिंह यादव यांनी अधिक माहिती दिली आहे. “एकूण १२ दिवसांची कमलनाथ संदेश यात्रा १० जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. या यात्रेदरम्यान २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५० सार्वजनिक सभा घेतल्या जातील. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या दातिया मतदारसंघात या यात्रेचा समारोप होईल. आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत नरोत्तम मिश्रा यांना पराभूत करायचे आहे,” असे दामोदरसिंह यादव यांनी सांगितले.

rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

यात्रेदरम्यान मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

या यात्रेदरम्यान काँग्रेस पक्ष त्यांच्या १५ महिन्यातील सरकारमधील कामांचा आधार घेत भाजपाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. कमलनाथ सरकारच्या काळात मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र शिवराजसिंह चौहाण यांच्या सरकारला या आरक्षणाची अंमलबजावणी करता आली नाही. याच मुद्द्याचा आधार घेत काँग्रेस या यात्रेमध्ये भाजपाविरोधात प्रचार करणार आहे.

काँग्रेसच्या आश्वासनांची जनतेला करून देणार आठवण

शिवराजसिंह चौहाण सरकारने महिलांच्या कल्याणासाठी ‘लाडकी बहीण योजना’ लागू केली आहे. या योजनेवरही काँग्रेस प्रामुख्याने टीका करणार आहे. विशेष म्हणजे या यात्रेदरम्यान काँग्रेस आपल्या नारी सन्मान योजना (महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये), प्रत्येक घराला गॅस सिलिंडर, स्वस्त दरात वीज (१०० युनिट्ससाठी १०० रुपये), जुनी पेन्शन योजना लागू करणे या आश्वासनांची जनतेला आठवण करून देणार आहे.