वर्धा: विधानसभा निवडणुकीत काही जागा विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. साम, दाम, दंड, भेद असे अस्त्र सरसकट वापरणारे नेते, उमेदवार दिसून येत असल्याचे चित्र नवे नाही. जिल्ह्यात चारही जागा निवडून आणण्याचा संकल्प भाजप नेत्यांनी २०१४ मध्येच सोडला. पण तो पूर्ण झाला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०१९ मध्ये खासदार आला पण देवळीची जागा पडली. जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट व वर्धा मतदारसंघात कमळ फुलले. पण देवळीत शक्य झाले नाही. अपवाद वगळता ईथे भाजपच लढली. पण विजय पदरात पडला नाही. काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे पाच टर्म पासून निवडून येत आहे. ते विजयासाठी ते युद्ध म्हणून मैदानात उतरत असल्याचा बोलबाला असतो. आवश्यक ते सर्व करण्याचे त्यांना कसब लाभल्याने भाजप त्यांच्या खेळीपुढे निष्प्रभ ठरत असल्याचे म्हटल्या जाते. यात विरोधी भाजपच्या नेत्यांना गळास लावत असल्याचे लपून नाही.
पराभूत भाजप उमेदवार मग अशा पक्षविरोधी नेत्यांची तक्रार पण करतो. पण आजवर कांबळे यांचा भेद करने भाजपला शक्य झाले नाही. म्हणून यावेळी काही ‘ पॉकेटबाज ‘ नेत्यांवर नजर ठेवल्या जात आहे. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे म्हणाले, ही बाब नाकारता येत नाही. तशा नेत्यांच्या तक्रारी पण वरिष्ठ नेत्यांकडे झाल्या आहेत. पण यावेळी असे काही केल्याचे दिसून आल्यास त्यांची खैर नाही. मी याच देवळी मतदारसंघात मतदार आहे. मी स्वतः व एक वेगळी टीम भाजप उमेदवार राजेश बकाने यांच्या विजयासाठी शर्थ करीत आहोत. वरिष्ठ नेते पण चौकस व लक्ष ठेवून आहेत. विरोधात काम करणारे किंवा मुद्दाम शांत बसणारे, असा आरोप झालेल्या नेत्यांवर आमचा कटाक्ष आहे.
हेही वाचा >>> काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य टिकविण्याचे आव्हान
तसा हा मतदारसंघ प्रभाताई राव कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जातो. मात्र तरीही हे कुटुंब नेहमीच विजयी राहले असेही नाही. कारण प्रभा राव यांचा एकदा माणिकराव सबाने व दुसऱ्यांदा शेतकरी संघटनेच्या सरोज काशीकर यांनी पराभव केला आहे. विरोधातही मतदान करण्याचा इतिहास ठेवून असणाऱ्या देवळीत मात्र कांबळे आल्यापासून इतिहासाची पुनरावृत्ती झालेली नाही. कारण कांबळे यांना काही भाजप नेत्यांची छुपी मदत होत असल्याची चर्चा खुलेआम झडत असते. भाजप नेतृत्वाने ही बाब आता खूप मनावर घेतल्याच्या काही घडामोडी आहेत.
हेही वाचा >>> ‘लाडक्या भावा’साठी खासदार बहिणीची राजकीय प्रतिष्ठा पणाला; वरोऱ्यात चुरशीची लढत
पॉकेटबाज व कार्यकर्त्यांना पण मिस कॉल लावून परत फोन करायला भाग पाडणाऱ्या एका नेत्यास जिल्ह्यातील अन्य एका मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या दिमतीस पाठविण्यात आले आहे. देवळी जागा भाजपच लढवेल हा निर्धार करणारे भाजप नेते सुधीर दिवे म्हणतात की ‘ अश्या ‘ नेत्यांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सर्व नेत्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली असून या निवडणुकीतील कामगिरीवर त्यांचे पुढील राजकीय भविष्य राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खुद्द या मतदारसंघातील असलेल्या जिल्हाध्यक्ष गफाट यांना इतर क्षेत्रापेक्षा देवळीत अधिक लक्ष देण्याची सूचना केली आहे. अँटी इन्कम्बसी मोठ्या प्रमाणात असून देवळीत भाजप दक्ष असल्याचे दिवे म्हणाले.