गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि आमगाव देवरी या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरीला उधाण आले आहे. या बंडखोरीची झळ काँग्रेस आणि महाविकास आघाडीला सर्वाधिक झळ बसण्याची चिन्हे आहे. यामुळे काँग्रेस ‘हायकमांड’ने बंडखोरांची गंभीर दखल घेत त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. यातील काही बंडखोर नरमले आहेत, तर काही अजूनही ठाम आहेत. पक्षश्रेष्ठी असो किंवा इतर कोणताही बडा नेता, कुणालाही जुमानणार नाही, असा पवित्रा या बंडखोरांनी घेतला आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी मिळालेली आहे. येथे महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी बंडखोरी केली. आता माघार घेणार असल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेसचे बंडखोर राजीव ठकरेले अजूनही अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने राजकुमार पुराम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात बंड पुकारणारे विद्यमान आमदार सहेशराम कोरेटी यांनी माघारीचा निर्णय घेतला आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 bjp candidate sumit wankhede contest polls from arvi assembly constituency
Bjp Candidate In Arvi Assembly Constituency : भाजपचा राज्यातील सर्वात ‘लाडका’ उमेदवार, त्याच्यासाठी वाट्टेल ते
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Shiv Sena vs Shiv Sena
शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची? हे ४९ मतदारसंघ ठरविणार दोन्ही गटांचे भवितव्य
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

तिरोडा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) पक्षाला गेली आहे. यामुळे काँग्रेसचे इच्छुक जितेंद्र कटरे, अर्चना ठाकरे, राधेलाल पटले यांनी बंडखोरी केली आहे. यापैकी कटरे आणि ठाकरे यांनी आपण माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.अर्जुनी मोरगाव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड उमेदवार आहेत. अजय लांजेवार आणि राजेश नंदागवळी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी नंदागवळी आपला अर्ज मागे घेणार आहेत, पण लांजेवार ठाम आहेत.

आणखी वाचा-गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?

अर्जुनी मोरगाव मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी

अर्जुनी मोरगाव मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. भाजपनेते, माजी मंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या रत्नदीप दहिवले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अद्यापपर्यंत त्यांच्याशी भाजपच्या कोणत्याही नेत्याने संपर्क केलेला नाही. यामुळे आपण निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader