चंद्रपूर : काँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायमच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गटागटांत विखुरला आहे. मात्र, मोठ्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी अंतर्गत गटबाजी विसरून एकदिलाने काम करावे, अशी पक्षश्रेष्ठींची भावना. मात्र, या भावनेला दरवेळीप्रमाणे यंदाही सुरुंग लावण्याचे काम नेत्यांनी केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या मतदारसंघांत प्रचारासाठी जाणे टाळत आहेत. नेत्यांमधील ही गटबाजी आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पसरली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्रिय प्रचारातून अंग काढून घेत आहेत.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या ब्रम्हपुरी मतदारसंघासोबत डॉ. सतीश वारजुरकर, बल्लारपूरमध्ये संतोष रावत आणि चंद्रपूर मतदारसंघात प्रवीण पडवेकर यांच्यासाठी प्रचारसभा व बैठका घेतल्या. मात्र, वरोरा व राजुरा मतदारसंघांत जाणे त्यांनी कटाक्षाने टाळले.

Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
After Mahayutis success in Kolhapur newly elected MLAs competing for guardian minister post
कोल्हापुरात मंत्रिपदासोबतच पालकमंत्रिपदाचीही स्पर्धा
maharashtra vidhan sabha election 2024 ahilyanagar result sharad pawar first time defeat print politics news
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठी घसरण
maharashtra vidhan sabha election congress lost in chandrapur district due to disrupt working print politics news
विस्कळीत कारभारामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव; ज्येष्ठ नेते आत्मचिंतन करणार का?
ex maharashtra cm prithviraj chavan express dought on electronic voting machines
मतदान यंत्रांच्या तपासणीस सरकार का घाबरते ?
Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांपुढे अस्तित्वाचा प्रश्न!
राज्यसभेचं तिकीट एक अन् इच्छुक अनेक, खासदारकीसाठी भाजप नेत्यांच्या दिल्लीवारी; कुणाची लागणार वर्णी? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेचं तिकीट एक अन् इच्छुक अनेक, खासदारकीसाठी भाजप नेत्यांची दिल्लीवारी; कुणाची लागणार वर्णी?

आणखी वाचा-सहा निवृत्त अधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध

खासदार प्रतिभा धानोरकर वरोरा व राजुरा मतदारसंघांत सभा, बैठक घेत आहेत. चंद्रपुरात पडवेकर यांच्या एका बैठकीला त्यांनी हजेरी लावली. तसेच स्वतःच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. मात्र, येथे सक्रिय प्रचारापासून त्या दूरच आहेत. बल्लारपूर मतदारसंघात जाण्याचेही त्यांनी टाळले.

चंद्रपूर मतदारसंघात तर शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय., सेवादल या काँग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र आहे. अनेक पदाधिकारी त्यांच्या गटातील उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघांत जात आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे स्वतःच्याच प्रचारात अडकून पडले आहेत.

आणखी वाचा-बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्यासमक्ष जयश्री शेळकेंचे तुल्यबळ आव्हान; कोण बाजी मारणार?

‘प्रचारात सहभागी व्हा’

वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील एक हॉटेलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आपापल्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी व्हा, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी त्यांनी सर्वांना शपथही दिली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पदाधिकारी के.राजू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रचार करा, असे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, पदाधिकारी सक्रिय प्रचारापासून दूरच आहेत. काँग्रेसमधील गटबाजी एवढी खोलवर रुजली आहे की ती संपता संपत नसल्याचेच चित्र आहे.

Story img Loader