अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजप व वंचित आघाडीमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. मतदारसंघात जातीय राजकारणासह मतविभाजनाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाला बंडखोरीसह अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात चुरशीचा सामना होत आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. गत १५ वर्षांपासून भाजपचे हरीश पिंपळे मूर्तिजापूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, यावेळेस त्यांच्या उमेदवारीवर अनिश्चितीचे सावट होते. पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर भाजपने शेवटच्या टप्प्यात त्यांच्या गळात उमेदवारीची माळ टाकली. भाजपने योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेऊन मतदारसंघात वातावरण निर्मिती केली. हरीश पिंपळे यांच्यासमोर वंचितचे डॉ. सुगत वाघमारे यांचे मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत वंचितला अवघ्या एक हजार ९१० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वंचितने उद्योजक डॉ. सुगत वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मतदारसंघात तयारी केली. विविध कार्यक्रम व उपक्रमांमधून डॉ. वाघमारेंनी मोर्चेबांधणीवर भर दिला. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपसह वंचितचे प्राबल्य आहे. ‘मविआ’मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले सम्राट डोंगरदिवे यांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून लढत तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार १५५ मते घेणारे रवी राठी यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून ते निवडणूक लढत आहे. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ‘मविआ’ अंतर्गत नाराजी व गटबाजीचे वातावरण असल्याने डोंगरदिवेंच्या अडचणीत वाढ झाली. मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितसाठी प्रतिष्ठेची लढत आहे. विविध समाजाची गठ्ठा मतपेढी कुणाच्या बाजुने झुकते, यावर देखील मूर्तिजापूरमधील राजकीय समीकरण ठरणार आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हे ही वाचा… Chandrapur Assembly Constituency : काँग्रेसमधील गटबाजी कायमच, चंद्रपूर जिल्ह्यात बड्या नेत्यांचा ठराविक मतदारसंघातच प्रचार

बौद्ध समाजाचे वजन कुणाच्या पारड्यात?

मूर्तिजापूर मतदारसंघात जातीय राजकारण निर्णायक स्थितीत आहे. हिंदू दलित म्हणून भाजप उमेदवार हरीश पिंपळे हे गुरुड जातीतून येतात. वंचितचे डॉ. सुगत वाघमारे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे व एमआयएमचे सम्राट सुरवाडे हे बौद्ध समाजाचे आहेत. २०१९ मध्ये वंचितला ५७ हजार ६१७ मते पडली होती. सम्राट डोंगरदिवे व सम्राट सुरवाडे पूर्वी वंचितमध्येच होते. निवडणूक लढण्याच्या दृष्टीने त्यांनी वेगळा मार्ग निवडला. मूर्तिजापूर मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मतविभाजन टाळण्याच्या दृष्टीने बौद्ध समाजाचा झुकाव वंचितकडे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणित जुळून येण्यासाठी मूर्तिजापूरमध्ये मतविभाजनाचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader