अलिबाग : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजप व महायुतीच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोकणात सर्वाधिक बंडखोरीचा फटका भाजपला बसला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग तिन्ही जिल्ह्यांत भाजपला बंडखोरीचा फटका बसला आहे.

रायगड जिल्ह्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी करत अलिबाग विधानसभा मतदाररसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पक्षाकडून वारंवार निर्देश देऊनही ते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ भाजपवर आली. मात्र आजही पक्षाची बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिलीप भोईर यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग प्रमाणे कर्जत मतदारसंघातून किरण ठाकरे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र रविंद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपानंतर ठाकरे यांनी माघार घेतली.

Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा : कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला

रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी पक्षत्याग करत शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला. येवढेच नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली. सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजन तेली भाजपकडून सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांच्याकडून उमेदवारी मिळवली. तर याच मतदारसंघातून भाजपचे विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेना शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांनांना आव्हान दिले आहे.

भाजपमधील बंडखोरी आणि पक्षांतराचा थेट फटका शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना बसणार आहे. रत्नागिरीत उदय सामंत, सिंधुदूर्गात दिपक केसरकर आणि रायगड मध्ये महेंद्र दळवी यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची समजूत काढतांना नेत्यांची दमछाक होत आहे. दापोली, गुहागर आणि राजापूर मतदारसंघात भाजपला उमेदवारी न मिळाल्याने, भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. या मतदारसंघात बंडखोरी झाली नसली तरी कार्यकर्त्यांनी आपली नाराजी लपून ठेवलेली नाही.

हेही वाचा : सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच

शत प्रतिशत भाजपाचा नारा बंडखोरीच्या मुळाशी ?

भाजपने शत प्रतिशत भाजपचा नारा देऊन विविध पक्षातील प्रस्तापित नेत्यांना पक्षात घेतले नंतर या नेत्यांना विधानसभा उमेदवारीची आस दाखवली. त्यामुळे या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या. राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या. त्यामुळे जेव्हा युतीमुळे उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात आले. तेव्हा या इच्छुकांनी बंडखोरीचे अथवा पक्षत्यागाचा हत्यार उपसले. त्यामुळे शत प्रतिशत भाजपाचा नारा पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून येण्या मागे कारणीभूत ठरला.

इतर पक्षात बंडखोरी कुठे…..

महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला कोकणात एकही जागा मिळाली नसल्याने, श्रीवर्धन मधून जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. तर राजापूर मतदारसंघात काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सावंतवाडी मतदारसंघात अर्चना घारे यांनी बंडखोरी केली आहे.

हेही वाचा : चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. महत्वाची बाब म्हणजे बंडखोरांसोबत कार्यकर्ते गेले नाहीत. आणि मतदारही जाणार नाहीत. त्यामुळे महायुतीच्या विजयमामध्ये बंडखोरांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. महायुतीच्या सर्व जागा चांगल्या मताधिक्याने निवडून येतील.

रविंद्र चव्हाण, भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री

Story img Loader