नागपूर : नागपूर जिल्ह्यात सर्व १२ ही मतदारसंघात प्रचार रणधुमाळी सुरू झाली असली तरी शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील सहाही मतदारसंघात याही वेळी अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे.

ग्रामीणमध्ये रामटेक, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि काटोल असे विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ आहेत. २०१९ च्या निवडणुकीत सावनेर, आणि उमरेडमध्ये काँग्रेसने तर काटोलमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. कामठी, हिंगणा भाजपकडे तर रामटेकची जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती. यावेळची निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत ग्रामीणमधील रामटेकची जागा जिंकून काँग्रेसने सर्व सहाही मतदारसंघात मताधिक्य घेऊन मुसंडी मारील होती. त्यामुळेच पक्षाने काटोल वगळता सर्व जागांवर दावा केला होता. रामटेकसाठी पक्षाचा आग्रह अधिक होता. पण रामटेचा दावा शिवसेनेने (ठाकरे) सोडला नाही. त्यामुळे तेथे काँग्रेसने बंडखोरी केली.

Deoli Vidhan Sabha Election Ranjeet Kamble vs Rajesh Bakane
Deoli Vidhan Sabha Constituency : भाजपचा निर्धार, यावेळी तरी देवळीत यशस्वी ठरणार का…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
maharashtra vidhan sabha election 2024,
पलूसमध्ये विश्वजित कदम, संग्रामसिंह देशमुखांमध्ये चुरशीची लढत
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
chimur vidhan sabha constituency kirtikumar bunty bhangdiya vs congress satish warjukar
चिमूरमध्ये थेट लढतीमुळे कीर्तीकुमार भांगडिया अडचणीत
ambrishrao Atram Aheri, Aheri, BJP Aheri,
अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही

रामटेकमध्ये बंडखोरी

एकनाथ शिंदे गटाचे आशीष जयस्वाल, ठाकरे गटाचे विशाल बरबटे आणि काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत सेना विरुद्ध सेना विरुद्ध बंडखोर अशी तिहेरी आहे. काँग्रेसच्या बंडामुळे ही जागा अधिक चर्चेत आली आहे. बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांनी पाच वर्षे हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी पुन्हा एकदा त्यांनी मतदारसंघ पालथा घातला. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार आशीष जयस्वाल यांनी प्रथम उद्धव ठाकरे यांची साथ दिली, पक्षफुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांच्यावर ‘गद्दार’ असा शिक्का लागला आहे. भाजपही त्यांच्यासोबत मनाने नाही, हे या पक्षाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जयस्वाल यांचे काम करणार नाही हे जाहीरपणे सांगितल्याने स्पष्ट झाले आहे. ॲण्टिइनकम्बन्सीचा फटका यावेळी जयस्वाल यांना बसू शकतो.

हेही वाचा – चिमूरमध्ये थेट लढतीमुळे कीर्तीकुमार भांगडिया अडचणीत

u

सावनेरमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजप

सावनेरमध्ये भाजपचे आशीष देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या अनुजा केदार यांच्यात खरी लढत आहे. प्रथमच काँग्रेस नेते सुनील केदारांशिवाय येथे निवडणूक होत आहे. केदार विरुद्ध देशमुख ही या मतदारसंघातील पारंपरिक लढत मानली जाते. एका निवडणुकीचा अपवाद सोडला तर केदार येथून सातत्याने विजयी होत आले. ते रिंगणात नसले तरी त्यांनी पत्नी अनुजा केदार यांच्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली आहे. भाजपने त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा बँक घोटाळ्याचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी ठेवला आहे. मात्र मतदारसंघावरील केदार यांची पकड लक्षात घेता भाजपला याही वेळी पूर्ण ताकद येथे लावावी लागणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. खऱ्या अर्थाने ही लढत केदार विरुद्ध फडणवीस अशीच होणार आहे.

कामठीत बावनकुळेंची प्रतिष्ठा पणाला

विद्यमान विधान परिषद सदस्य असून आणि कामठीत पक्षाचाच आमदार असताना बावनकुळे यांना पक्षाने कामठीतून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांची लढत पूर्वाश्रमीचे भाजपचे व नंतर काँग्रेसवासी झालेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्याशी आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात मंत्री म्हणून मतदारसंघात केलेली विकास कामे आणि सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ ही बावनकुळेंची बलस्थाने आहेत. कामठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मोठ्या संख्येने दलित आणि मुस्लिमांची मते काँग्रेसचे बलस्थान आहे. शहरालगतच्या पण कामठी मतदारसंघात येत असलेल्या वस्त्यांचा कल महत्त्वपूर्ण ठरतो. लोकसभा निवडणुकीत भाजप या मतदारसंघातून पिछाडीवर होता. एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा – Tasgaon Kavathe Mahankal Assembly Elections : ‘एक मत, दोन आमदार’ तासगाव – कवठेमहांकाळमध्ये वेगळाच प्रचार

देशमुखांना बंडखोरीचा त्रास

राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यावेळी काटोलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर आणि काँग्रेस बंडखोर याज्ञवल्क्य जिचकार रिंगणात आहेत. जिचकारांची बंडखोरी सलील यांच्यासाठी जशी डोकेदुखीची ठरणार आहे, तशीच अनिल देशमुख या नावाचा एक उमेदवार अजित पवार याच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. नामसाधर्म्याचा फटकाही देशमुख यांना बसू शकतो. मात्र महायुती सरकारने देशमुख यांच्यावर केलेली कारवाई व त्यांनी भोगलेला तुरुंगवास यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. त्याचा फायदा सलील यांना होऊ शकतो.

हिंगण्यात बंग यांचे आव्हान

हिंगणा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेले भाजपचे समीर मेघे यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने माजी मंत्री रमेश बंग यांना रिंगणात उतरवले आहे. यामतदारसंघात बोगस मतदारांचा वाद गाजला, पंधरा हजारावर मते यादीतून गाळण्यात आली आहे. बंग यांचे वय झाले असले तरी शरद पवार यांचा करिश्मा व काँग्रेस नेते सुनील केदार यांची साथ बंग यांना मिळाली तर ते भाजपपुढे आव्हान उभे करू शकतात.

उमरेडमध्ये मेश्राम विरुद्ध पारवे

उमरेड मतदारसंघात काँग्रेसचे संजय मेश्राम आणि भाजपचे सुधीर पारवे यांच्यात पुन्हा एकदा लढत होत आहे. पारवे २०१९ मध्ये पराभूत झाले होते. ही जागा काँग्रेसच्या राजू पारवे यांनी जिंकली होती. त्यापूर्वीच्या निवडणुकीत सुधीर पारवे यांनी संजय मेश्राम यांचा पराभव केला होता. लोकसभेत या मतदारसंघातून काँग्रेसने घेतलेली आघाडी लक्षात घेता यंदा मेश्राम यांना येथे संधी आहे.

Story img Loader