नागपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव उमरेड विधानसभा मतदारसंघात बौद्ध विरुद्ध हिंदू दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघातील राजकारणही पारवे कुटुंबाभोवती फिरत राहिले. मात्र, माजी आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत प्रथम शिवसेना आणि आता भाजपचे कमळ हाती घेतल्याने अनेक वर्षांनंतर काँग्रेसने या मतदारसंघात पुन्हा एकदा संजय मेश्राम हे बौद्ध उमेदवार दिले आहेत. तर भाजपने यावेळीही हिंदू दलित सुधीर पारवेंवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण भाजपसाठी फायद्याचे ठरणार असून मतविभाजन टाळण्यावर काँग्रेसचा सर्वाधिक जोर राहणार आहे.

उमेरड मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात प्रत्येक गावात कार्यकर्ते तयार करून पक्ष मजबूत केला होता. मात्र, मुळक पाच वर्षे आमदार राहिल्यावर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. काँग्रेसने २०१४ मध्ये येथे बौद्ध उमेदवार म्हणून डॉ. शिरीष मेश्राम यांना संधी दिली होती. त्यांच्याविरोधात भाजपने हिंदू दलित सुधीर पारवे यांना संधी दिल्याने अन्य हिंदू समाजाची मते घेत त्यांनी विजय खेचून आणला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

आणखी वाचा-‘मविआ’च्या उमेदवारांना काँग्रेसच्या बंडखोरीचा फटका बसणार!

काँग्रेसने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत ही चूक टाळण्यासाठी भाजपच्या सुधीर पारवेंच्या विरोधात हिंदू दलित म्हणून राजू पारवे यांना उमेदवारी दिली. यामुळे या मतदारसंघात हिंदू दलित विरुद्ध हिंदू दलित अशा लढतीत काँग्रेसचे राजू पारवे यांनी दहा वर्षांनंतर ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. परंतु, राजू पारवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून रामटेक लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत उमरेडची जागा शिंदे गटासाठी सोडली जाईल व पुन्हा राजू पारवे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने या जागेवर सुधीर पारवे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे राजू पारवे यांच्या हाती काहीच लागले नाही. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभेतील स्थिती

लोकसभा निवडणुकीमध्ये उमरेड विधानसभा क्षेत्रातून महायुतीचे राजू पारवे यांना १४ हजार ८७९ मतांनी पिछाडीवर होते. त्यांना ८३ हजार २८९ तर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना ९८ हजार १६८ मते मिळाली होती. विशेष म्हणजे. ते या भागाचे आमदार होते व त्यांना येथून आघाडी अपेक्षित होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथील मतदार कुणाला कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आणखी वाचा-राज्यात हरियाणा प्रारुपाचा प्रयोग शक्य झाला का ? उमेदवारांच्या संख्येत २८ टक्के वाढ

मतदारसंघातील राजकीय परिस्थिती

उमरेड विधानसभेत २ लाख ९० हजारांच्या घरात मतदारांची संख्या आहे. येथील सामाजिक आणि जातीय समीकरणाचा विचार केल्यास बौद्ध, तेली आण कुणबी समाजातील मतदारांची संख्या अधिक आहे. यासोबत मुस्लीम समाजाची मतेही निर्णायक आहेत. २००९ आणि २०१४ मध्ये येथून भाजपचे सुधीर पारवे विजयी झाले होते. यावेळी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आणि विश्वासू संजय मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा हिंदू दलित विरुद्ध बौद्ध अशी लढत होणार आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून भाजपने या मतदारसंघात आतापर्यंत विजय मिळवला आहे. २०१९ मध्ये बसपचे संदीप मेश्राम यांनी १८ हजार मते घेतली होती. त्यामुळे काँग्रेसला हिंदू मतांसोबतच बसप, वंचितमुळे होणारे मतविभाजन टाळणे आव्हान राहणार आहे.

Story img Loader