छत्रपती संभाजीनगर, जालना : अर्जून खोतकरांशी दिलजमाई करताना काढल्या जाणाऱ्या छायाचित्राच्या चौकटीत आपला कार्यकर्ता घुसू पाहतोय असे लक्षात आल्यावर त्याला पायाने ‘चौकटी’ बाहेर काढणाऱ्या चिलचित्रणामुळे भाजपचे निवडणूक प्रमूख रावसाहेब दानवे पुन्हा वादात सापडले आहेत.

‘कितीही द्या, रडतातच साले’ असे शेतकऱ्यांच्या बाबत त्यांनी केलेले विधान, सिल्लोडमध्ये सत्तार यांनी ‘मिनी पाकिस्तान केले’ या विधानांसह रावसाहेब दानवे यांच्या भोवताली वादाचे रिंगण कायम राहिले होते. राजकारणातील विविध डावपेचामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या रावसाहेब दानवे याना ‘चकवा’ अशीही बिरुदावली लावली जाते. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा मुलगा संताेष दानवे भोकरदन आणि मुलगी संजना जाधव कन्नड मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?

जालना विधानसभा मतदारसंघात अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये शीतयुद्ध असते. निवडणुकांपूर्वी ते दिलजमाई करतात, हेही आता मतदारसंघात माहीत झालेले आहे. दिलजमाईचे चलचित्रणात चित्रणाच्या चौकटीत येणाऱ्या कार्यकर्त्यांस पायाने दूर लोटण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवे करत असल्याचे समाजमाध्यमातून पुढे आले आणि रावसाहेब दानवे यांच्या भोवती वादाचे नवे रिंगण उभे ठाकले.

जालना लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे खचून जाणारा नेता नाही, असे सांगत ते प्रचाराला लागले होते. निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने गावागावातील संपर्क त्यांनी वाढवला होता. त्यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्या मतदारसंघातही त्यांना काहीशी मते कमी मिळाली होती. मात्र, चर्चेत राहणाऱ्या रावसाहेब यांनी त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना महायुतीमधून उमदेवारी मिळवली. कन्नडमध्ये संजना जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अलिकडेच सभा घेतली. गावोगावी होणाऱ्या भाषणात मराठा आरक्षणासाठी भाजपने केलेले कामही ते आवर्जून सांगत होते. मात्र, पायाने कार्यकर्त्यांस चौकटीबाहेर ढकलण्याच्या प्रयत्नांमुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.

या पूर्वी पैठण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘लक्ष्मी दर्शन’ करा, पण भाजपला मतदान करा, हे त्यांचे वक्तव्यही वादग्रस्त ठरले होते. ग्रामीण बेरकी राजकारणातील रावसाहेब दानवे त्यांच्या वेगवेगळ्या कृतीने चर्चेत असतात. केंद्रीय मंत्री असताना गाडी थांबवून ते जुन्या माणसांशी संवाद साधायचे. जनावराचे वय मोजण्यासाठी त्याचे दात मोजण्यापर्यंतच्या अनेक बारकाईच्या बाबी त्यांना माहीत आहेत. मात्र, ऐन निवडणुकीमध्ये त्यांचे चलचित्र सध्या वादात सापडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – लातूरमध्ये काँग्रेसकडे वळलेल्या लिंगायत मतपेढीला भाजपची साद

यासंदर्भात संबंधित कार्यकर्त्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले, आपण तीस वर्षांपासून दानवे यांचेे मित्र आहाेत. खाेतकर यांच्या सत्काराचे छायाचित्र काढण्यात येत असताना दानवेंचे शर्ट व्यवस्थित नव्हते आणि त्याबद्दल त्यांना कल्पना नव्हती. त्यांच्या हातात सत्कारासाठीचे पुष्पगुच्छ हाेते. समाजमाध्यमावरील चित्रफितीमध्ये जसे दिसते तसे काही घडलेले नाही. तर काही समर्थकांकडून सांगण्यात येते की, दानवे यांच्याकडून तशी कृती केली जाणे शक्य नसले तरी विराेधक यासंदर्भात अकारण टीका करीत आहेत.

Story img Loader