भंडारा : कुणबीबहुल साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विरोधी उमेदवार तेवढा तुल्यबळ नसल्याने नानांनी मतदारसंघाऐवजी बाहेर प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. साकोली मतदारसंघात महाविकास आघाडीकडून पटोले, महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर आणि भाजपचे बंडखोर डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

साकोली मतदारसंघात कुणबी समाजाची मते निर्णायक ठरतात. याशिवाय कोहळी, तेली, अनुसूचित जाती व इतर समाजाची मतेही निकालात महत्त्वाची भूमिका बजावतात. येथे पटोले यांच्या विरोधात कुणबी उमेदवार द्यायचा म्हणून राष्ट्रवादीचे अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपने आपल्या तिकिटावर रिंगणात उतरवले. यामुळे भाजपमध्ये बंडखोरी झाली. परिणामी सोमदत्त करंजेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. भाजपमधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार बाळा काशीवार, माजी जि. प. अध्यक्ष अॅड. वसंत एंचिलवार हे करंजेकर यांच्या पाठीशी आहेत. निष्ठावंतांना डावलल्यामुळे नाराज झालेला भाजप कार्यकर्ता आणि तेली समाज काशीवार व एंचिलवार यांच्याकडे म्हणजेच करंजेकर यांच्याकडे वळल्याचे चित्र आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

२०१९ मध्ये पटोले व भाजपचे डॉ. परिणय फुके यांच्यात झालेली लढत लक्षवेधी ठरली होती. त्यावेळी पटोले ९५,२०८ मते, तर फुके यांना ८८,९६८ मते मिळाली होती. या वेळी पटोले यांना त्यांचे प्रतिस्पर्धी तुल्यबळ वाटत नसल्याने त्यांनी प्रचाराकडे दुर्लक्ष केले असून, साकोलीत त्यांचा प्रचार थंडावल्याचे चित्र आहे. पटोले व भाजपचे ब्राह्मणकर आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या भरवशावर, तर डॉ. करंजेकर दोन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत.

हेही वाचा >>> दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई

निर्णायक मुद्दे

● गेल्या दीड दशकापांसून मुंडीपार सडक ता. साकोली येथे प्रस्तावित भेल प्रकल्प रखडलेला आहे. मतदारसंघात उद्याोगधंद्यांचा अभाव असल्याने बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे.

● गेल्या ३० वर्षांपासून भीमलकसा आणि निम्न चुलबंद हे दोन महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न भंगले आहे. लाखांदूर आणि लाखनी या दोन्ही तालुक्यांची उद्याोगधंद्यांच्या बाबतीत पीछेहाट झाली आहे. येथे नव्या प्रकल्पाची उभारणी झालीच नाही.

● धानाचे विक्रमी उत्पादन होऊनही येथे प्रक्रिया उद्याोग नाही. मतदारसंघात ४५० पेक्षा अधिक तलाव असूनही सिंचन क्षमता कमी आहे. पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाकडे प्रचंड दुर्लक्ष झाले असून, उच्च शिक्षणाच्या सोयींचा अभाव आहे.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महाविकास आघाडी- १,१७,५०१ 

● महायुती- ९०,१३५

Story img Loader